LIC कडून पॉलिसी घेणार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! 15 नोव्हेंबरपर्यंत मिळणार ‘ही’ खास सुट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने आपल्या ग्राहकांसाठी खास नवीन योजना आणली आहे. याद्वारे तुम्ही तुमची बंद पडलेली जुनी पॉलिसी पुन्हा सुरु करू शकता. जर तुम्ही दीर्घ काळापासून पॉलिसीचा हफ्ता न भरल्यामुळे बंद झाली असेल तर आता तुम्ही पुन्हा ती सुरु करू शकता. यासाठी एलआयसीच्या विशेष रिव्हायव्हल अभियान सुरु केले असून यामार्फ़त तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. जाणून घ्या या योजनेविषयी

15 नोव्हेंबरपर्यंत घ्या फायदा
एलआयसीने ट्विट करून सांगितले कि, हे विशेष अभियान 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत सुरु राहणार असून यादरम्यान तुम्ही तुमच्या बंद पडलेल्या पॉलिसी सुरु करू शकता.

1) ज्या लोकांनी आपली पॉलिसी सरेंडर केलेली नाही त्या व्यक्तींना याचा लाभ घेता येणार आहे. मात्र तुम्हाला यासाठी काही विशिष्ट रक्कम देखील भरावी लागणार आहे.

2) या योजनेत शुल्कावर काही फायदा देखील मिळत आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता. या योजनेमध्ये ग्राहकांना डेथ बेनिफिट्स देखील मिळणार आहे.

3)पॉलिसी धारकाचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला त्याची रक्कम मिळणार आहे. मात्र तुम्ही पॉलिसीचे हफ्ते भरले नाही तर यावरील फायदा तुम्हाला मिळणार नाही. यामध्ये एकावेळी तुम्ही एकच पॉलिसी सुरु करू शकता. मात्र हि पॉलिसी बंद होऊन तीन वर्षापेक्षा अधिक काळ लोटायला नको.

4) यामध्ये ग्राहक आपला रजिस्टर्ड मोबाइल नंबर, NEFT डिटेल आणि ई-मेल देखील नोंदवू शकतो.

Visit : Policenama.com 

हळद आरोग्यासाठी चांगली, परंतु, योग्य वापर करा, होऊ शकतो दुष्परिणाम
बॉडी बनविण्यासाठी आहारात घ्या ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !
 जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
 ‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार