Life Insurance Fitness Rewards | फिट रहा आणि इन्श्युरन्स प्रीमियमवर सूट मिळवा, जाणून घ्या IRDAI च्या उपक्रमाबाबत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Life Insurance Fitness Rewards | इन्श्युरन्स रेग्युलेटर इरडाने (IRDAI) फिटनेसकडे लक्ष देणार्‍या लोकांसाठी इन्श्युरनस प्रीमियमवर सूट (Life Insurance Fitness Rewards) देण्यासाठी गाईडलाईन जारी केली आहे. इरडाने याबाबत नियम बनवण्यासाठी विमा कंपन्यांकडून सूचना मागवल्या आहेत. हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये निरोगीपणावर अनेक प्रकारची सवलत मिळत आहे. आता अशाप्रकारची सवलत जीवन विमा पॉलिसीमध्ये देण्याचा विचार सुरू आहे.

 

विमा कंपन्यांना सुद्धा फायदा

 

फिटनेसवर वेगळी सूट मिळाल्याने विमाधारकाला जसा लाभ होईल तसाच विमा कंपन्यांना सुद्धा फायदा होईल. कारण क्लेमचे प्रमाण कमी होईल.

 

इन्श्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी – इरडा (IRDAI) या नवीन उपक्रमाच्या निमित्ताने लोकांना फिट आणि हेल्दी लाईफसाठी प्रोत्साहन देईल.

 

निरोगी लोकांना इन्श्युरन्सवर दोन प्रकारचे फायदे दिले जाऊ शकतात. यामध्ये दोन प्रकारे इन्सेंटिव्ह देण्याचा प्लान आहे. विमा कंपन्या पॉलिसीधारकाला व्हाऊचर, रिव्हॉर्ड पॉईंटद्वारे प्रोत्साहन देतील आणि यासाठी कंपन्या ग्राहकांना जिम, किंवा योगा सेंटरची मेंबरशिप देऊ शकतात.

 

तसेच फिट व्यक्तीला पॉलिसी रिन्युअलवेळी प्रीमियममध्ये डिस्काऊंट दिला जाऊ शकतो. पॉलिसीत समअ‍ॅश्युर्ड वाढवण्याचा पर्याय सुद्धा दिला जाऊ शकतो.

 

यासाठी जर या वाढत्या महागाईत आपले खर्च नियंत्रित करायचे असतील आणि इन्श्युरन्सवर फायदा  घ्यायचा असेल तर आजपासून आरोग्याकडे लक्ष द्या.

 

Web Title : life insurance fitness rewards stay fit and pay less for health insurance IRDAI

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

जर तुमचे सुद्धा असेल PNB मध्ये खाते तर होईल 15 लाखांचा फायदा, जाणून घ्या कसा

Anti Corruption Bureau Mumbai | 15 हजारीची लाच मागणारे अंमली पदार्थ विरोधी पथकातील 2 पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Modi Government | दुचाकीवर 4 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी हेल्मेट सक्ती? मोदी सरकारने सूचना अन् हरकती मागवल्या