तुमच्या लाईफ इन्श्युरन्स पॉलिसीनं तुम्ही आनंदी नसाल तर ‘या’ पद्धतीनं करा कॅन्सल, मिळेल रिफंड, जाणून घ्या

नवी दिल्ली : लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी केल्यानंतर अनेकदा असे होते की, तिचे फायदे तुम्हाला योग्य वाटत नाहीत. अशावेळी जर तुमची इच्छा असेल तर ही पॉलिसी कॅन्सल करण्यात अडचणी येऊ शकतात आणि काही बाबतीत कॅन्सलसुद्धा करू शकणार नाहीत. परंतु, प्रत्येक पॉलिसी खरेदी करण्याच्या सुरूवातीला ग्रेस पीरियड असतो, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही ती कॅन्सल करून रिफंड प्राप्त करू शकता.

कॅन्सल करण्यापूर्वी कारण ठरवा
एक्सपर्टचे म्हणणे आहे की, कोणतीही लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी कॅन्सल करण्यापूर्वी तुम्ही चांगल्या पद्धतीने विश्लेषण केले पाहिजे की, अखेर पॉलिसी का कॅन्सल करायची आहे. सामान्यपणे एक पॉलिसी कॅन्सल करून चांगले फायदे देणारी दुसरी पॉलिसी खरेदी करण्याचा निर्णय सर्वात योग्य कारण ठरू शकते.

लासूरचे सीईओ अभिषेक तिवारी म्हणतात की, कोणतीही पॉलिसी कॅन्सल करण्याची चांगली पद्धत इन्श्युररला लेटर/ईमेल लिहून रिक्वेस्ट करणे ही आहे. यानंतर जर रिफंड होत असेल तर त्यासाठी सुद्धा क्लेम करू शकता.

लाईफ इन्श्युरन्स एक मोठ्या कालावधीचा करार असतो. मात्र, यावर पॉलिसी खरेदी केल्यानंतर 15 ते 30 दिवसाच्या कालावधीत पॉलिसी होल्डर ती कॅन्सल करू शकतो. त्यांना रिफंडसुद्धा मिळू शकतो.

पॉलिसी कॅन्सल करण्यासाठी द्यावी लागेल माहिती
पॉलिसी एक्सचे संस्थापक व सीईओ नवल गोयल म्हणतात, पॉलिसी कॅन्सल करण्यासाठी पॉलिसी होल्डरला एक लेखी रिक्वेस्ट द्यावी लागते. यामध्ये पॉलिसीची रिसीप्ट तारीखसह अन्य माहिती असावी. कॅन्सलेशनचे कारण सांगण्यासह पॉलिसी एजंटची डिटेलसुद्धा द्यावी लागेल. रिक्वेस्ट मिळाल्यानंतर इन्श्युरन्स कंपनीचा प्रतिनिधी पॉलिसी होल्डरशी संपर्क साधतो.

आवश्यक चार्जेस कापल्यानंतर रिफंड मिळतो
ते पुढे म्हणाले की, जर पॉलिसी होल्डर अजूनही कॅन्सल करण्यावर ठाम असेल तर कंपनी रिक्वेस्टची पुढील प्रोसेस सुरू होते. यांनतर अनिवार्य चार्जेसच्या कपातीनंतर रिफंड दिला जातो. या चार्जेसमध्ये इन्श्युरन्स कंपनीद्वारे मेडिकल परीक्षण खर्च, प्रो-रेटेड रिस्क प्रीमियम आणि स्टॅम्प ड्यूटी चार्ज कापला जातो.

उशीराने कॅन्सल केल्यास काय होते?
जेव्हा फ्री लुक पीरियड संपतो तेव्हा पॉलिसी सरेंडर करूनच कॅन्सल करता येते. अशा प्रकरणात इन्श्युरन्स कंपनी अन्य प्रकारचे चार्जेससुद्धा कापून घेते. त्यानंतरच रिफंंड मिळतो. हा वेगवेगळ्या प्रकरणांसाठी वेगळा असतो. मात्र, अनेक पॉलिसी होल्डर अशा स्थितीत प्रीमियम जमा करणे सोडून देतात आणि नंतर इन्श्युरन्स कंपनीकडून रिटेंशनचा प्रयत्न केला जातो.