कोट्यावधी जीवन विमा पॉलिसीधारकांना दिलासा देणारा Irdai चा निर्णय ! प्रीमियम भरण्यासाठी एवढ्या दिवसांचा अतिरिक्त कालावधी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (Irdai) जीवन विमा पॉलिसीधारकांना एक मोठी भेट दिली आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने जीवन विमा पॉलिसीधारकांना प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अधिक कालावधी दिला आहे. कोरोना विषाणू साथीमुळे देशात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नियामकाने हे पाऊल उचलले आहे. ज्या जीवन विमा पॉलिसीधारकांची नूतनीकरण तारीख मार्च आणि एप्रिलमध्ये येते त्यांना प्रीमियम भरण्यासाठी अतिरिक्त 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. आयआरडीएने अगोदरच आरोग्य विमा पॉलिसीचे नूतनीकरण प्रीमियम आणि थर्ड पार्टी मोटर विमा भरण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला आहे.

जीवन विमा कंपन्या आणि जीवन विमा परिषदेने नियामकाकडून प्रीमियम भरण्यासाठी अतिरिक्त कालावधी मागितला होता. पॉलिसीधारकांना प्रीमियम भरण्यासाठी नियामकाने अतिरिक्त 30 दिवसांचा कालावधी जारी केला आहे. विमा कंपन्यांनी आणि कौन्सिलने चिंता व्यक्त केली होती की, पॉलिसीधारकांना 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे आणि सामाजिक अंतरामुळे प्रीमियम भरण्यात अडचणी येत आहेत.

नियामकाने म्हटले आहे की ज्या युनिटशी संबंधित पॉलिसींची 31 मे 2020 पर्यंत मुदत संपत असेल आणि फंड व्हॅल्यूची मुबलक रकमेची भरपाई करावी लागेल तेथे विमा कंपन्या संबंधित तरतुदींनुसार ‘सेटलमेंट ऑप्शन्स’ देऊ शकतात. इरडाच्या परिपत्रकात म्हटले आहे की हा एकमुखी पर्याय दिला जाऊ शकतो, अर्थात एखाद्या विशिष्ट उत्पादनामध्ये ते देण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नाही.

गेल्या आठवड्यात, Irdia ने सांगितले की थर्ड पार्टी मोटार विमा आणि आरोग्य विमा प्रीमियम (25 मार्च ते 14 एप्रिल 2020 दरम्यान पडणारा) 21 एप्रिल 2020 रोजी किंवा त्यापूर्वी भरला जाऊ शकतो. लॉकडाऊन कालावधी 25 मार्च ते 15 एप्रिल पर्यंत आहे. म्हणजेच आपल्या पॉलिसीचा कालावधी 10 दिवसांनी वाढला आहे. जर या कालावधीत आपली पॉलिसी कालबाह्य झाली असेल तर आपल्याला त्या पॉलिसीचे कव्हरेज आणि फायदे मिळणे सुरू राहील.