‘हे’ 3 दिवस मला कायम लक्षात राहतात, शरद पवारांनी स्वतः सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस. यावेळी हा वाढदिवस यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रम आयोजित करत आला. यावेळी अनेक नेत्यांसह राज्यभरातील काँग्रेस नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी सर्वांचे आभार मानले ते म्हणाले की 12 डिसेंबरलाच माझ्या आईचा वाढदिवस असतो. त्यामुळे माझ्या वाढदिवसापेक्षा माझ्या आईचा वाढदिवस म्हणून हा दिवस मला लक्षात राहतो.

शरद पवार म्हणाले की, मला माझ्या जन्मदिवसापेक्षा माझ्या आईचा जन्म दिवस लक्षात राहतो. माझ्या आईने अनेक कष्ट केले. शेतात काम करायची, जे पीक येईल ते बाजारात पोहचविण्याची. सामाजिक कामाची तिला आवड. अतिशय कष्टाने आम्हाला तिने शिकवलं आणि वाढवलं. 1936 साली ती पहिल्यांदा निवडून आली. महिलांच्यावतीने महिलांसाठी काम करता येतं हा आदर्श त्यांनी घालून दिला.

मुलींचे शिक्षण, आत्मविश्वासाने मुलींनी पुढे आले पाहिजे हा तिचा आयुष्यभर आग्रह होता. तिच्या अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. सार्वजनिक जीवनात काम करताना अनेकदा यश मिळतं. सन्मान मिळतो, काहीवेळा संकटं येतात. या संकटाला सामोरे जाण्याची शक्ती कोणाकडून येतात याचा विचार मी करतो त्यावेळी 2 व्यक्ती माझ्यासमोर येतात. एक माझी आई आणि दुसरी महाराष्ट्राची जनता.

शरद पवार यावेळी म्हणाले की, माझ्या आईचा जन्म 12 डिसेंबरचा, बायकोचा जन्म 13 डिसेंबरचा. अनेक मित्र आहेत ज्यांचा जन्म 11 डिसेंबरचा. एकेकाळी या देशातील चित्रपटसृष्टी गाजवणारे दिलीप कुमार हे माझे जवळचे मित्र, त्यांचा जन्म 11 डिसेंबरचा. त्यामुळे 11,12,13 या तारख्या अनेक वर्ष आम्ही खाजगीत कोणाच्या तरी घरी एकत्र जमून एकमेकांचे अभिष्टचिंतन करत असतो.

त्यांचबरोबर सत्तेत असताना अनेक धोरणं राबविता येतात. ज्या जनतेसाठी आपण योजना आणतो, त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचत आहेत का नाहीत याचं खरं वास्तव सत्तेतून दूर गेल्यानंतर लक्षात येते. आपली बांधिलकी समाजाशी आहे. तरुण पिढीशी आहे. यांना जोडून घेण्यासाठी काम करा असे मार्गदर्शन शरद पवारांनी कार्यकर्त्यांना केले.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/