किरकोळ कारणावरून चिमुकल्याचा गळा चिरणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

पाचवीत शिकणाऱ्या आशुतोष वाबळे चिमुकल्याचा किरकोळ कारणावरून विळ्याने गळा चिरण्यात आला होता. ही घटना २०१३ मध्ये कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे घडली होती. या प्रकरणातील मुख्यआरोपी गणेश वाबळे याला कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’467fca08-be24-11e8-9f2a-01be313e35ed’]

पाचवीत शिकणारा आशुतोष वाबळे हा १३ मे २०१३रोजी घराच्या अंगणात खेळत असताना आरोपी गणेश याने विहीरीच्या पाणाच्या वादातून त्या चिमुकल्याचा गळा विळ्याने कापला होता. मुलाचा आरडाओरड ऐकून त्याची आई घरातून बाहेर आली असता आरोपीने शेजारीच असलेल्या विहीरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

व्हाईटनरच्या नशेत गुरफटलीत शेकडो मुले

या गुन्ह्यातील आरोपी गणेश वाबळेविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यातमध्ये भादंवि ३०७, ३०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोपरगाव पोलिसांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्याची सुनावणी कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. यावेळी सरकारपक्षातर्फे चौदा साक्षीदार तपासण्यात आले होते. यात तक्रार करणारी विद्या वाबळे, प्रभाकर वाबळे, प्रदिप वाबळे, बाळु मेहरखांब, रविंद विघे, अमोल नागरे, तपाशी अधिकारी बाळासाहेब पारखे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पुष्कर लेले, डॉ. शेखर  फडके, सुरेगावचे पोलिस पाटील संजय वाबळे यांच्या साक्षी झाल्या. पीडित आशुतोष याची साक्ष सर्वात महत्वाची ठरली होती. सरकारपक्षाचे म्हणने व युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधिशांनी आरोपीस जन्मठेप व १० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.