Life without Organs : ‘या’ 8 अवयवांशिवायही जगू शकतो माणूस; जाणून घ्या

नवी दिल्ली : मानवी शरीरातील प्रत्येक अवयव तसा महत्त्वाचा आहेच. या प्रत्येक अवयवांचे वेगवेगळे कार्य आहे. पण आपल्या शरीरातील 8 असे अवयव आहेत ते जरी शरीरात नसले तरीही आपण जगू शकतो. पण त्या अवयवांबाबत कदाचित अनेकांना माहिती नसेल. त्यामुळे आज आपण अशाच अवयवांची माहिती घेणार आहोत.

मानवी शरीर हे एकप्रकारचे मशिन आहे. ज्यामध्ये 600 पेक्षा जास्त मांसपेशी आहेत तर सुमारे 206 हाडे आणि हजारो नस आहेत.

गॉलब्लेडर : आपल्या डायजेशन सिस्टिममध्ये गॉलब्लेडरचे (पित्ताशयातील थर) प्रमुख कार्य असते. अनेकांच्या शरीरात किडनी स्टोनची समस्या होत असते. त्यामुळे त्यांच्या शरीरातून गॉलब्लेडर काढला जातो. तरीही लोक सामान्य जीवन जगत असतात.

स्प्लीन : स्प्लीन म्हणजेच तिल्ली पसलियाच्या खाली शरीराचा एक खास अवयव असतो. शरीरात तिल्लीचे मुख्य कार्य गर्भात वाढत असलेल्या बाळामध्ये रक्ताची निर्मिती करणे. जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा स्प्लीन ब्लड प्लेटलेट्स स्टोर, अँटिबॉडिज बनवते आणि रक्तातील असामान्य सेल्सना नष्ट करण्याचे काम करते.

फुफ्फुस : शरीरातील सेल्स जिवंत राखण्यासाठी फुफ्फुसाची महत्त्वाची भूमिका असते. याचे मुख्यकार्य श्वसननलिकेपासून येणारा ऑक्सिजनला रक्तापर्यंत पोहोचवणे. याशिवाय अनावश्यक कार्बन डायऑक्साईडला बाहेर फेकणे. दोन्ही फुफ्फुस पूर्णपणे शरीरातील कार्यासाठी एकच काम करतात. त्यामुळे तुम्ही एकाच फुफ्फुसामुळे जिवंत राहू शकता.

रिप्रोडक्टिस ऑर्गेन्स : रिप्रोडक्टिस ऑर्गेन्स नसल्यामुळे माणूस सर्वसामान्य जीवन जगू शकतो. अनेकदा महिलांना मासिक पाळी अनियमित झाल्यामुळे सर्जिकल मेनोपॉज करावे लागते. त्यानंतर महिलेची नैसर्गिक गर्भधारणा कठीण होते. मात्र, तिच्या जीवनात कोणताही फरक पडत नाही.

ऍपेंडिक्स : ऍपेंडिक्स शरीरातील इम्युनोग्लोबुलिंसला निर्माण करतो. हा एक प्रोटीन आहे आणि इन्फेक्शनपासून लढण्यासाठी इम्यून सिस्टिमला मदत करतो. मानवी शरीरात ऍपेंडिक्स असणे गरजेचे नसते. त्याशिवायही जगता येऊ शकते. हे एक गंभीर प्रकारचे इन्फेक्शन असून, योग्यवेळी ते काढले नाही तर मोठी समस्या उद्भवू शकते.

ब्लेडर : शरीरातील एक असा अवयव आहे जो युरिनरी ट्रॅक्टच्या प्रोसेसमध्ये विशेष भूमिका बजावतो. कॅन्सर किंवा इन्फ्लेमेटरी डिसॉर्डरमुळे मानवी शरीरातून ब्लेडर काढले जाते.

किडनी : आपल्या युरिनरी सिस्टिममध्ये दोन किडनी असतात. एक रक्ताचे शुद्धीकरण करते आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते आणि ब्लड प्रेशर रेग्युलेट करण्यासाठी हार्मोन बनवते. जर एक किडनी निकामी झाली तरीही दुसऱ्या किडनीवर माणूस जगू शकतो. पण जरी दोन्ही किडनी निकामी झाली तर डाटलिसिसवर माणूस जिवंत राहू शकतो.