माणसांमुळे प्राण्यांची जीवनशैली बिघडली ; अनेक श्वान डायलिसिसवर !

पोलिसनामा ऑनलाईन टीम- जीवनशैली बदलल्याने माणसांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार असे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. चूकीचा आहार, व्यायामाचा अभाव, प्रदुषण, चूकीच्या सवयी यामुळे माणसाचे आरोग्य बिघडत चालले आहे. तर दुसरीकडे हाच माणूस जे प्राणी पाळतो त्यांचीही जीवनशैली अशाच प्रकारची झाल्याने त्यांनाही किडनीच्या तसेच अन्य आजारांनी ग्रासल्याचे दिसत आहे. कुत्र्यांना देखील किडनीचे आजार बळावत आहेत. धक्कादायक म्हणजे पाळीव प्राण्यांवरही आता नियमित डायलिसीस करण्याची वेळ आली आहे. अनेक कुत्रे किडनीच्या समस्यांसाठी पशू वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.

पाळीव प्राण्यांसाठीही आहार व व्यायाम आवश्यक असतो. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने पाळीव प्राण्यांना विविध आजार होऊ लागले आहेत. पुरेसे पाणी न मिळाल्याने कुत्र्यांच्या किडनीवर परिणाम होऊन किडनी निकामी होण्याचा धोका अधिक असतो. बदलत्या जीवनशैलीमुळे प्राण्यांमध्ये किडनी विकार वाढले आहेत. हायप्रोटीन डाएट आणि व्यायामाचा अभावाने कुत्र्यांचे मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रकार वाढले आहेत. अश्या अनेक कुत्र्यांना डायलिसीसवर ठेवण्यात येत आहे.

किडनीच्या आजाराने त्रस्त अनेक श्वान उपचारासाठी डॉक्टरांकडे येत असतात. जर्मन शेफर्ड, पामोलियन आणि लॅब कुत्र्यांमध्ये किडनीच्या आजाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. किडनी निकामी झाल्यास त्यावर प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय असतो. पण प्राण्यांमध्ये अजूनही प्रत्यारोपण होत नसल्याने त्यांना कायम डायलिसीसवरच रहावे लागते. अति-प्रथिनयुक्त आहार आणि व्यायामाचा अभाव याचा परिणाम कुत्र्यांच्या किडनीवर होतो. पाळीव प्राण्यांचा मालकाने बाहेर नेल्यास त्याचा व्यायाम होतो. मात्र अनेकदा प्राण्यांना एकाच ठिकाणी बसून ठेवल्याने ते आजारी पडतात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like