‘या’ 5 सवयींचा अवलंब केल्याने तुम्हाला छातीत जळजळ आणि अपचनपासून मिळू शकेल आराम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    आपल्या शरीराचीही एक यंत्रणा असते. तुम्ही कधी कोणत्यावेळी काय खायला हवे हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. जर तुम्ही नको त्या वेळी नको त्या गोष्टी खात असाल तर तुम्हाला अ‍ॅसिडीटीचा त्रास होणारचं. एखादी गोष्ट आवडली म्हणून क्षमतेपेक्षा जास्त खाणेही तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही कारण तुम्ही जर क्षमतेपेक्षा जास्त खाल्ले तरी देखील तुम्हाला अ‍ॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो. क्षमतेपेक्षा जास्त खाल्ल्यामुळे तुमचे अन्न पचत नाही आणि मग तुम्हाला अ‍ॅसिडीटीचा त्रास होऊ लागतो. क्षमतेपेक्षा अधिक खाणेही तुम्हाला त्रासदायक ठरु शकते. यासाठी काय करावे हे जाणून घ्या..

वजन नियंत्रित करा

वजन वाढणे ही समस्या आता फार सामान्य झाली आहे. पण वजन जास्त प्रमाणात वाढल्यास कित्येक गंभीर आजारांचीही लागण होते. भविष्यात हे धोके टाळण्यासाठी आपले वजन नियंत्रणात राहील, याची काळजी घ्यावी. वजन कमी करण्यासाठी शरीराची चयापचयाची क्षमता चांगली असणं आवश्यक आहे. पचन प्रक्रिया चांगली असल्यास आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा होणार नाही. शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातील.

कमी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खा

जर आपण जास्त कार्बचे सेवन केले तर काही कार्ब आपल्या शरीराच्या आत पचणार नाहीत आणि यामुळे आपल्या पोटात बॅक्टेरियांची संख्या वाढेल. अ‍ॅसिड रिफ्लक्स हे देखील एक मुख्य कारण आहे. म्हणून, कमी कार्ब आहार योग्य आहे.

जास्त कॉफी पिऊ नका

अधिक कॉफी प्यायल्याने तुमचे डायाफ्राम कमजोर होते, ज्यामुळे अ‍ॅसिड रिफ्लक्स होण्याचा धोका वाढतो. आपण कॅफिनशिवाय कॉफी प्यायल्यास ते आपले जास्त नुकसान करत नाही. तर तुम्हाला कॉफी पिण्याची आवड असल्यास एकतर कॅफिनशिवाय कॉफी प्या किंवा कॉफी कमी करा.

च्युइंगमचे चर्वण

संशोधनाने हे सिद्ध केले आहे की, आपण जेवल्यानंतर ताबडतोब 20 मिनिटे साखर मुक्त च्युइंगमचे चर्वण केले तर आपल्या अन्ननलिकेत अ‍ॅसिडची मात्रा कमी होते. वास्तविक च्युइंगमचे चर्वण केल्यामुळे लाळ बनते, ज्यामुळे रिफ्लक्स कमी होण्यास मदत होते. बायकार्बोनेट असलेल्या च्युइंगगमचा प्रभाव जास्त असतो. म्हणून च्युइंगगममुळे अ‍ॅसिड रिफ्लक्सची समस्या कमी होते.

जिऱ्याचे पाणी

तुम्ही घरी असताना तुम्हाला अ‍ॅसिडीचा त्रास झाला असेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करुन पाहू शकता. पाणी गरम करुन त्यात साधारण एक चमचा जिरे घाला. जिऱ्याचा अर्क संपूर्णपणे पाण्यात उतरल्यानंतर ते पाणी थंड करुन त्या पाण्याचे सेवन करा. अ‍ॅसडीटीमुळे तुमच्या पोटात मुरडा आला असेल किंवा तुम्हाला गॅसेस झाल्यासारखे वाटत असतील तर तुम्ही जिऱ्याचे पाणी अगदी हमखास प्या. तुम्हाला लगेचच बरे वाटेल.