‘कोरोना’ व्हायरसपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कोणते ‘मास्क’ ठरेल ‘फायदेशीर’, जाणून घ्या

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था – जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसने कहर माजवला आहे, यापासून भारत देखील दूर नाही. भारतात देखील कोरोनाची दहशत पसरत आहे. भारताच्या अनेक शहरात मिळून कोरोना बाधित रुग्णांची संख्या 28 झाली असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. भारतात कोरोनाचे इतके रुग्ण आढळल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कशी काळजी घेता येईल याचा लोक विचार करत आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे तोंडाला लावण्याचे मास्क. बाजारात असे अनेक मास्क उपलब्ध आहेत परंतु सर्वच मास्क कोरोना व्हायरसपासून बचाव करु शकणारे नाहीत. परंतु काही मास्क असे आहेत जे कोरोनापासून तुम्हाला दूर ठेवतील.

1. सर्जिकल मास्क –
हे मास्क डिस्पोजेबल आहे, हे मास्क रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि रुग्ण वापरतात. हे मास्क प्रभावकारी असल्याचे सांगितले जाते कारण हे मास्क आतपासून बाहेरपर्यंत सर्व बॅक्टेरियाचे इंफेक्शन रोखतात. परंतु हे मास्क 3 – 8 तासांपेक्षा जास्त काळ घालणे योग्य नाही परंतु हे तुम्हाला कोरोना व्हायरसपासून वाचवू शकते.

2. रेस्पिरेटर मास्क –
सर्जिकल मास्क वर तुम्ही जास्त विश्वास ठेवू शकतात. कारण हे आतपासून बाहेरपर्यंत बॅक्टेरिया इंफेक्शन रोखू शकतात. हे मास्क कोरोना, एचआयव्ही आणि सार्स सारख्या व्हायरसला रोखू शकतात.

रेस्पिरेटरी मास्कचे दोन प्रकार आहेत –
इन्सुयलेटिंग रेस्पिरेटर मास्क आणि फिल्टरिंग रेस्पिरेटर मास्क. याचा वापर गॅस लिक झाल्यास केला जातो. यूरोपीयन स्टॅंडर्ड नुसार हे मास्क आहेत. रेस्पिरेटर मास्क 3 डिस्पोजेबल व्हरायटीमध्ये मिळेल.

3. FFP1 मास्क –
या मास्कची गुणवत्ता तेवढी चांगली नाही, यात फिल्ट्रेशन 80 टक्के आणि लिकेज 22 टक्के होते. तुम्ही घरात याचा वापर करु शकतात.

4. FFP2 मास्क –
हे क्वॉलिटीमध्ये FFP1 च्या तुलनेत चांगले आहे. यामुळे 94 टक्के फिल्ट्रेशन होते तर यातून 8 टक्के लिकेज होते. सध्या हे कोरोना पासून बचाव करण्यासाठी वापरले जाऊ शकते.

5. FFP3 मास्क –
हे सर्वात फाइन क्वॉलिटीचे मास्क आहे. यातून 99 टक्के फिल्ट्रेशन होते आणि 2 टक्के लिकेज होते. कोरोना, सार्स आणि इतर व्हायरसपासून बचावासाठी याची मदत घेतली जाऊ शकते. परंतु प्रश्न हा आहे की भारतासारख्या देशात जेथे लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे तेथे हे मास्क किती फायदेशीर ठरतील. असे असले तरी हे मास्क खोकला आणि शिंकेद्वारे पसरणाऱ्या संसर्गाला रोखू शकतात.