टाचदुखीनं त्रस्त आहात ? घरच्या घरीच करा ‘हे’ 5 सोपे उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अनेकांना टाचदुखीची किंवा तळवे दुखण्याची समस्या असते. अशात काही घरगुती उपाय केले तर या समस्येत आराम मिळू शकतो. आज अशाच काही घरगुती उपायांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) कोमट पाण्यात खडेमीठ टाकावं. या पाण्यात 15 ते 20 मिनिटे पाय टाकून बसावं. यामुळं पायांना शेक मिळतो आणि टाचदुखी काही प्रमाणात कमी होते.

2) घरच्या घरी करता येतील अशी काही सोपी आसनं किंवा व्यायाम करावेत. उदा. भिंतीला हात टेकून पायाच्या बोटांवर उभं रहावं आणि टाचा वर उचलाव्यात. या स्थितीत जागच्या जागी जॉगिंग करण्याचा प्रयत्न करावा.

3) टाचदुखी हा वाताचा एक प्रकार आहे. त्यामुळं अनेकदा हिवाळा किंवा पावसाळा या ऋतुत टाचदुखीची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवते. त्यामुळं घरात असताना कायम मऊ चप्पल किंवा स्लीपरचा वापर करावा.

4) विटेचा एक तुकडा थोडा गरम करून त्यावर रूईचं पान बांधावं आणि त्याचा शेक टाच दुखत असलेल्या भागांवर द्यावा.

5) गोडतेल आणि मीठ एकत्र करून लेप तयार करावा. हा लेप टाचेवर लावावा आणि टाचा सुती कापडानं बांधून ठेवाव्यात.

टीप –  वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.