मूल जन्माला घालण्यात अडचण येते ? आई बनण्यासाठी महिलांनो करा ‘हे’ काम, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आई होणं ही जगातील सर्व महिलांसाठी सर्वात सुख देणारी गोष्ट आहे. परंतु अनेक महिलांमध्ये इंफर्टीलिटीची समस्या येते. जगातील जवळपास 16 टक्के लोक या समस्येने ग्रस्त आहेत. इंफर्टीलिटीची समस्या पुरुष आणि महिला अशा दोघांमध्ये होऊ शकते. आज आपण काही अशा पद्धती जाणून घेणार आहोत ज्यामुळे या समस्येवर मात केली जाऊ शकते आणि महिला आई होऊ शकते.

1) औषधे आणि हार्मोन्स – या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी महिलांना फर्टीलिटीची औषधे आणि हार्मोन्स खूप उपयोगी ठरतात. यामुळे महिलांमध्ये अंडे बनण्याच्या आणि हार्मोन स्तर सुधारण्याच्या प्रक्रियेत मदत मिळते.

2) सर्जरी – इंफर्लिटीलिटीवर मात करण्यासाठी महिलांसाठी सर्जरी हा एक चांगला पर्याय आहे. सर्जरीच्या मदतीने फर्टिलिटीवर परिणाम करणारे टिश्यू महिलांच्या शरीरातून काढले जातात. यामुळे ब्लॉक झालेल्या फेलोपियनही ओपन केल्या जातात.

3) आययुआय – यामध्ये स्पर्म कलेक्ट करून महिलेच्या गर्भाशयात पोहोचवले जातात. जेव्हा शरीरात अंडे फलित होण्याची प्रक्रिया सुरू होते तेव्हे हे केलं जातं.

4) आयव्हीएफ – या पद्धतीत स्पर्म आणि एग्ज यांना लॅबमध्ये फर्टीलाईज केलं जातं. फर्टीलाईज केलेला एग 3 ते 5 दिवसात विकसित होऊन भ्रूण बनतं. यानंतर हे भ्रूण महिलेच्या गर्भाशयात ठेवलं जातं.

5) जीआयएफटी आणि झेडआयएफटी – या पद्धतीत स्पर्म आणि एग यांना कलेक्ट करून महिलेच्या फेलोपियन ट्युबमध्ये टाकलं जातं. जीआयएफटी प्रक्रियेत स्पर्म आणि एग दोघांना फेलोपियन ट्युबमध्ये टाकलं जातं. तर झेडआयएफटी मध्ये स्पर्म आणि एग यांना पहिलं लॅबमध्ये फर्टीलाईज केलं जातं. यानंतर 24 तासांनी एग फर्टीलाईज होतं. यानंतर ते महिलेच्या फेलोपियन ट्युबमध्ये ठेवलं जातं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/