जाणून घ्या पदार्थाची चव वाढवणाऱ्या मोहरीचे ‘हे’ 10 गुणकारी फायदे !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – स्वयंपाकघरात मोहरीला किती महत्त्व आहे हे कुणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही. पदार्थाची चव वाढवणाऱ्या या मोहरीचे आपल्या शरीराला अनेक गुणकारी फायदे होतात. आज आपण याच फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

1) अपचन, पोटदुखी, अजीर्ण झाल्यास मोहरीचं चूर्ण आणि खडीसाखर एकत्र करून पाण्यासोबत घ्यावी. त्यामुळं पोटाचे विकार किंवा इतर समस्या दूर होतात.

2) तीव्र ताप, सर्दी, कफ झाल्यास मोहरीचं चूर्ण आणि मध एकत्र करून ते चाटण घ्यावं.

3) पायात काटा किंवा काच गेल्यास त्या ठिकाणी मोहरीचं चूर्ण, तूप आणि मध एकत्र करून त्याचा लेप लावावा.

4) संधीवातात हात-पाय दुखत असतील तर एरंडाच्या पानाला मोहरीचं तेल लावून ते पान गरम करून दुखत असलेल्या भागावर बांधून ठेवावं.

5) दातदुखी, दात किडणं अशा समस्येवर गरम पाण्यात मोहरी उकळून त्या पाण्यानं गुळण्या कराव्यात. त्यामुळं दातातील कीड मरते. तसंच हिरड्या मजबूत होतात.

6) खाज, खरूज किंवा तर त्वचा विकार झाल्यास गोमूत्रात मोहरी वाटून त्यात थोडी हळद मिक्स करावी. हा लेप प्रभावित जागेवर लावावा. त्यानंतर थोड्या वेळानं हा लेप पाण्यानं धुवून टाकावा.

7) चामखीळ किंवा मस असल्यास त्या जागी मोहरीचं तेल नियमित लावावं. चामखील मस गळून पडतात.

8) मासिक पाळी नियमित येण्यासाठी मोहरीचं चूर्ण घेत रहावं.

9) अर्धशिशी, मस्तकशुळ उठल्यास मोहरी बारीक वाटून त्याचा लेप लावावा. मायग्रेनचा त्रास असेल तर तोही यामुळं बरा होतो.

10) कान दुखत असेल तर मोहरीचं तेल गरम करून त्याचे थेंब कानात टाकावे.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.