महाशिवरात्री 2020 : असा करा ‘हेल्दी’ उपवास ! ‘या’ 9 गोष्टी लक्षात ठेवा

पोलीसनामा ऑनलाइन – उपवास केल्याने अनेकांना अपचनाचा त्रास होतो, पोट बिघडते. यासाठी उपवासात काही फराळाच्या बाबतीत काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे. हेल्दी उपवास करायचा असेल तर अतितेलकट, अतिजड पदार्थ टाळले पाहिजेत. कारण अशा पदार्थांमुळेच पोट बिघडते. तसेच निर्जळी उपवास टाळावा, कारण यामुळे अ‍ॅसिडीटीची समस्या होऊ शकते. उपवास आणि आरोग्य यांचे संतुलन ठेवण्यासाठी खाण्या-पिण्याची काळजी घेतली पाहिजे. महाशिवरात्रीचा उपवास दुसर्‍या दिवशी सोडला जातो, हा उपवास करणार्‍यांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत जाणून घेवूयात.

हे लक्षात ठेवा

1 उपवासाच्या दिवशी अधूनमधून ताक प्या. यामुळे शरीरात थंडावा मिळतो.

2 रताळे सेवन करा. तसेच ते पचायला हलके असून खनिजांचे प्रमाण भरूर असल्याने बटाट्याऐवजी रताळ्याला प्राधान्य द्या.

3 रात्री लवकर फराळ करा.

4 झोपताना दूध प्या. अ‍ॅसिडीटी होत असल्यास थंड दूध प्या.

5 फराळ कमी प्रमाणात खा.

6 हलके पदार्थ खा.

7 तळलेले पदार्थ टाळा.

8 खिचडी ऐवजी साबुदाण्याची लापशी किंवा खीर खा. तर साबुदाणा वड्याऐवजी साबुदाणा-बटाटा थालीपीठ कमी तेलावर करून खा.

9 तेलकट वेफर्स, साबुदाणा वड्यांऐवजी भरपूर फळे खा.