मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हृदय हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. गेल्या काही वर्षांपासून तरुण पिढीमध्ये हृदयासंबंधीचे आजार वाढू लागले आहेत. हृदयविकाराच्या झटक्याने आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला असून याचे मुख्य कारण बदली जीवनशैली. सद्यस्थितीत तरुण पिढी व्यायाम, योगा या गोष्टीकडे दुर्लक्ष करता. तसेच खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी, दुर्लक्ष करणे यामुळे अनेकदा आरोग्य बिघडते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात कोणत्या पर्दार्थांचा समावेश असावा हे जाणून घेऊया.
1. ब्रोकली
ब्रोकली ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. शरीरातील नुकसानकारक विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, व्हिटॅमिन के, ओमेगा 3 फॅटी ॲसिड, पोटॅशियम, मॅगनीज, फॉस्फोरससारखे तत्व असतात. त्यामुळे याचा नियमित आहारात समावेश केल्याने रत्त शुद्ध राहण्यासोबतच वेगवेगळ्या दृष्टीने फायदा होतो.
2. बेरीज
बेरीजमध्ये अनेक पोषक घटक असतात. ॲटीऑक्सिडेंट्सचे प्रमाणही अधिक असते. तसेच कॅलरीचे प्रमाण कमी असून फायबरचे प्रमाण अधिक असते. ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी याची मदत होते. स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रासबेरी यासारख्या सर्व प्रकारच्या बेरीज हृदयासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे आहारात बेरीजचा समावेश असावा.
3. फ्लॅक्ससीड्स
फ्लॅक्ससीड्समधील फायबर, पोटॅशियम, ओमेगा 3 चे प्रमाण हे अधिक असते हे हृदयासाठी उपयुक्त ठरते. डायबेटीस आणि हायपरटेंशनचा धोकाही यामुळे कमी होतो.
4. अक्रोड
डायाफ्रुट्समध्ये प्रामुख्याने समाविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळून येतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरतं. हृदयासंबंधित आजारांसाठी अक्रोड परिणामकारक ठरतं. स्मरणशक्तीसाठीही अक्रोड खाणं गुणकारी असतं.
5. दही
दह्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन्स, व्हिटॅमिन आढळून येतं. दुधाच्या तुलनेत दही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. दही हृदयासंबंधित आजारांसाठी आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. दह्याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते. या सर्व पदार्थांसोबतच आहारामध्ये ताज्या भाज्या आणि फळांचा देखील समावेश करा.
टीप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहतवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.