Lightning | वीज कोसळल्याने देशात 78 लोकांचा गेला बळी; पीएम मोदींनी केली आर्थिक मदतीची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह देशाच्या इतर राज्यांमध्ये आकाशातून वीज कोसळल्याने (Lightning ) एकुण 78 लोकांचा जीव गेला. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त करत पीडितांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली. उत्तर प्रदेशात 41 आणि मध्य प्रदेशात दोन दिवसांच्या आत वीज कोसळून 14 जणांचा जीव गेला. तर, राजस्थानच्या सहा जिल्ह्यात 23 लोकांचा मृत्यू झाला. यासोबतच 28 जखमी झाले. Lightning | 78 people died in the country due to lightning pm modi announced relief amount

आमेर किल्ल्याच्या वॉच टॉवरवर दुर्घटना
सर्वात जास्त 12 लोकांचा मृत्यू जयपुरमध्ये झाला. हे सर्व आमेर किल्ल्याच्या वॉच टॉवरवर उभे राहून हवामानाचा आनंद घेत होते. आमेर किल्लयाच्या वॉच टॉवरवर ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये 9 स्थानिक आणि 3 पर्यटक होते. तिकडे, मध्य प्रदेशात वीज पडल्याने दोन दिवसात (रविवार आणि सोमवार) 14 जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा रविवारी वीज पडल्याने 41 लोकांचा जीव गेला होता.

12 लोकांचा घटनास्थळी मृत्यू
माहितीनुसार, आमेर किल्ला आणि वॉच टॉवरवर जाण्याची परवानगी सायंकाळी सात वाजेपर्यंतच आहे, परंतु सुमारे 25 लोक रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत तिथे होते. या दरम्यान पावसासह वीज कोसळली ज्यामध्ये 12 लोकांचा घटनास्थळी मृत्यू झाला. वॉच टॉवरवर बहुतांश लोक सेल्फी घेण्यासाठी गेले होते.

 

रात्रभर सुरू होते बचावकार्य

आपत्ती व्यवस्थापन टीमचे उप नियंत्रक जगदीश रावत यांनी सांगितले की, जिथे वीज कोसळली तिथे लाईटची व्यवस्था नाही. दुर्घटनेनंतर एका जखमी व्यक्तीने मोबाइलवरून कंट्रोल रूमला माहिती दिली. यानंतर रात्री 8:30 वाजता आपत्ती व्यवस्थापन दल आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले.

ड्रोनने देखील घेतला लोकांचा शोध
अंधार असल्याने अगोदर मोबाईलच्या फ्लॅश लाईटने लोकांना डोंगरावरून खाली आणण्यात आले. रात्रभर बचाव कार्य सुरू होते, जे सकाळी संपले. या दरम्यान ड्रोनने देखील लोकांचा शोध घेण्यात आला. जयपुर पोलीस उपायुक्त राहुल प्रकाश यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता मृतांच्या संख्येला अधिकृत दुजोरा दिला. त्यांनी 12 लोकांच्या मृत्यूसह 10 लोक जखमी झाल्याचे सांगितले.

पीएम आणि सीएमने केली मदतीची घोषणा
पंतप्रधान मदत निधीतून मरणार्‍यांच्या कुटुंबियांना दोन-दोन लाख आणि जखमींना 50-50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मृतांविषयी दु:ख व्यक्त केले आहे.

तसेच मृतांच्या कुटुंबियांना पाच-पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी सुद्धा दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.

Web Titel :- Lightning | 78 people died in the country due to lightning pm modi announced relief amount

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis । नाना पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेनं शिवसेना-राष्ट्रवादीला कापरं भरलं, अन्…

Maharashtra Police Recruitment | राज्यात डिसेंबर 2021 पर्यंत 5200 पोलिसांची भरती, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांची घोषणा (व्हिडिओ)

SSB HC Recruitment 2021 | तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! हेड कॉन्स्टेबलच्या 115 जागांसाठी भरती