Lightning | सावधान ! पावसाळ्यात बाल्कनीत मोबाइलवर बोलू नका, वीजेचा आहे धोका, जाणून घ्या कसा करावा बचाव

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  जर तुम्ही पावसाचा (Rain) आनंद घेण्यासाठी बाल्कनीत उभे आहात आणि मोबाइलवर बोलत असाल तर सावध व्हा. कारण हे जीवघेणे ठरू शकते. अशावेळी पडणारी वीज (Lightning) (पावसाळ्यात मेघगर्जनेसह आकाशातून पडणारी वीज) विद्युत वाहक वस्तुंवर पडते. या वीजेची क्षमता वेल्डिंग मशीनच्या वीजेपेक्षा 100 पट जास्त असते. ती क्षणभरात राख करू शकते. Lightning | be careful during lightning in rain and not to use mobile phone in balcony

विद्युत विभाग ( Electrical department) विशेषकरून यापासून बचाव करण्यासाठी लायटनिंग अरेस्टर (विद्यूत वाहक) चा वापर करतो, जेणेकरून उपकरण उद्ध्वस्त होण्याचा धोका राहात नाही, असे केस्कोचे कार्यकारी अभियंता मनीष गुप्ता यांनी म्हटले आहे.

कधी वाढतो वीज पडण्याचा धोका :

चंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे हवामान तज्ज्ञ डॉ. एस. एन. सुनील पांडेय (Weather expert Dr. S. N. Sunil Pandey) सांगतात की, अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीतून येणारी मान्सून हवा आद्रतेची असते, तर राजस्थानकडून येणारी हवा कोरडी असते. दोन्ही एकत्र आल्याने ढग तयार होतात, तेव्हा पाऊस पडतो, परंतु यामुळे वीज पडण्याचा धोका वाढतो.

 

असा करा बचाव

जर उघड्या ठिकाणी आहात तर तात्काळ एखाद्या पक्क्या घरात आश्रय घ्या. खिडकी, दरवाजे, ओटा आणि छतापासून दूर रहा.

लोखंडी खांब असलेल्या पुलाच्या जवळपास तर अजिबात थांबू नका.

ऊंच इमारतीच्या भागात आश्रय घेऊ नका कारण येथे वीज (Lightning) पडण्याचा धोका जास्त असतो.

आपली कार इत्यादी वाहनात असाल तर त्यातच रहा परंतु बाईकपासून दूर व्हा कारण त्यावेळी पाय जमीनीवर राहतात.

विद्युत वाहक उपकरणांपासून दूर रहा आणि घरात सुरू असलेला टीव्ही, फ्रिज इत्यादी उपकरणे बंद करा.

तलाव, जलाशये आणि स्विमिंग पूलापासून दूर रहा.

  जर शेतात किंवा जंगलात असाल तर दाट आणि बुटक्या झाडाचा आधार घ्या, परंतु प्रयत्न करा की पायाखाली प्लॅस्टिकची गोणी किंवा, लाकूड, किंवा सुकी पाने ठेवा.

गर्दीकरून उभे राहू नका. तसेच जवळपास वीज किंवा टेलीफोनची तार असू नये.

वीजेच्या मृत्यूचे तात्कालिक कारण हृदयविकाराचा झटका (Heart attack) असते.

Web Title : Lightning | be careful during lightning in rain and not to use mobile phone in balcony

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोने-चांदीच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या आजचे दर

7th Pay Commission | जुलै 2021 मध्येच वाढणार महागाई भत्ता ! पीएम नरेंद्र मोदी देऊ शकतात DA वाढीला मंजूरी

NEET 2021 Exam Date | जाहीर झाली नीट परीक्षेची तारीख, सप्टेंबरमध्ये ‘या’ दिवशी होईल परीक्षा; अर्ज प्रक्रिया उद्यापासून