शरद पवारांप्रमाणे ‘या’ महिला आमदाराने केली तीच चुक यंदा

आचार संहिताभंगाचा गुन्हा दाखल

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पाच वर्षांपूर्वी २०१४ मध्ये नवी मुंबई बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथेच जाहीर सभेत बोलताना जी चुक केली होती. तीच चुक बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आणि पोलिसांनी आचारसंहिता भंगाचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध दाखल केला आहे.

लोकसभेच्या ठाणे व सातारा मतदारसंघातून भाजप शिवसेना महायुतीचे राजन विचारे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील हे निवडणूक लढवत आहेत. अगोदर २३ एप्रिलला साताऱ्यात मतदान करा आणि त्यानंतर २९ एप्रिल रोजी नवी मुंबईत राजन विचारे यांना मतदान करा असा सल्ला मंदा म्हात्रे यांनी कोपरखैरणे येथील जाहीर सभेत दिला. त्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुक आयोगाकडे तक्रार केली.

नवी मुंबईत भाजी मार्केट व अन्य ठिकाणी सातारा परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर माथाडी कामगार म्हणून काम करत आहेत. त्यामुळे गेल्या वेळी नवी मुंबईतच माथाडी कामगारांच्या मेळाव्यात शरद पवार यांनी अशाप्रकारे दोन ठिकाणी मतदान करण्याचा अजब सल्ला दिला होता. त्यावेळी झालेल्या टिकेमुळे त्यांनी आपण गंमत म्हणून आपण असे बोलल्याचे सांगत त्यातून स्वत:ची सुटका करुन घेतली होती.

यंदा कोपरखैरणे येथे कार्यकर्ता मेळाव्यात आमदार मंदा म्हात्रे यांनी तिच चूक केली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ऐरोली विभागाचे अध्यक्ष राहुल शिंदे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मंदा म्हात्रे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading...
You might also like