Game of Thrones वेबसिरीजचे निर्माते लीन ची यांची चहात विष कालवून हत्या

शंघाय : वृत्तसंस्था – Game of Thrones या वेब सीरिजचे निर्माते लिन ची यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही घटना ख्रिसमसच्या दिवशी घडली आहे. लिन ची यांची कट रचून हत्या करण्यात आली आहे. त्यांना चहामधून विष देण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शंघाय पोलिसांनी लिन ची यांचा सहकारी जू याओ याच्यावर संशय घेतला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. लिन हे केवळ 39 वर्षाचे होते. विशेष म्हणजे चायनाच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचा समावेश आहे. गेमिंग क्षेत्रात त्यांचे नाव जगभरात प्रसिद्ध आहे. अल्पावधीतच त्यांनी या क्षेत्रात नाव कमावले होते. आजच्या घडीला त्यांची एकूण संपती जवळपास 6.8 बिलियन युआन म्हणजे भारतीय चलनानुसार 76 अरब 60 करोड रुपये एवढी आहे. लिन यांची हत्या संपत्तीमुळे झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.

लिन ची चीनमधील गेमिंग क्षेत्रातील सर्वात गाजलेले व्यक्तीपैकी एक होते. सिनेक्षे्रात मिळालेल्या यशानंतर त्यांना गेमिंग क्षेत्रात मोठे यश आले. दिवसेंदिवस त्यांची प्रगती होत असताना 2009 मध्ये त्यांनी याझु नावाची कंपनी सुरू केली. दरम्यानच्या काळात मोबाईल गेमिंग क्षेत्रातही त्यांनी उत्तम कामगीरी करत भरघोस यश मिळवले.

अल्पावधीतच लिन यांची याझु कंपनी चीनपुरतीच मर्यादीत राहिली नाही. तर या कंपनीने जगभरात कंपन्या सुरु केल्या. आशिया, युरोप आणि अमेरिकेत कंपन्या सुरु केल्या. Game of Thrones या वेब सीरिजचे ते डेव्हलपर म्हणून जगभरात त्यांना ओळखले जात होते