Lingayat Community News | होय, आम्ही बसव तत्व स्वीकारलयं ! लिंगायत युवा पिढीची परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल

पोलीसनामा ऑनलाइन – Lingayat Community News | बाराव्या शतकात महात्मा बसवण्णा यांनी जात, वर्ण, वर्ग, लिंगभेदा विरोधात आवाज उठवत समग्र क्रांती घडवून आणली आणि स्वतंत्र अशा लिंगायत धर्माची स्थापना केली. वचन साहित्याद्वारे लिंगायतांना जगण्याचा मार्ग दाखविला. मात्र काळाच्या ओघात लिंगायतांना या मार्गाचा विसर पडला आणि त्यांनी दूसरा मार्ग स्वीकारला. परंतू आता परिस्थिती बदलत आहे. लिंगायत धर्म गुरू बसवण्णा आणि शरणांद्वारे रचित वचन साहित्याबद्दल जागरूकता वाढत आहे. त्यामुळे अर्थातच तरूण पिढीचा कल लिंगायत धर्माच्या मुळ आचरणाकडे वाढताना दिसत आहे. (Lingayat Community News)

याबद्दल बसववादी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सिध्दराम नावदगेरे यांनी सांगितले की, ही खूप आशादायक गोष्ट आहे की, तरूण पिढी बसव तत्वाकडे वळत आहे. ते स्वीकारून जीवन जगत आहे. वचन साहित्य मानवी जीवनासाठी मार्गदर्शक आहे. लिंगायत स्वतंत्र धर्म असल्यामुळे अर्थातच आचरण पध्दती देखील भिन्न आहेत. बसव तत्वानूसार कोणताही कार्यक्रम करायचा असल्यास अवडंबराला स्थान नसते. अतीशय साध्या पध्दतीने कार्यक्रम पार पाडले जातात. त्यामुळे वेळेचा आणि पैशांचा अपव्यय होत नाही. (Lingayat Community News)

बसववादी सोशल फाउंडेशनतर्फे इष्टलिंग दिक्षा, नामकरण विधी, जावळ, वाढदिवस, ऋतुमती समारंभ, साखरपुडा,
कल्याण महोत्सव (विवाह), डोहाळे जेवण, गर्भ लिंग संस्कार, नूतन वास्तू गुरूप्रवेश, नवीन उद्योग प्रारंभ, दुकानातील पूजन,
अंत्यसंस्कार अशा सर्व प्रकारचे विधी बसव तत्वानूसार केले जातात. यासाठी बसव तत्वी जंगमांची एक स्वतंत्र टीम आहे.
बसव तत्वानूसार कार्यक्रम करण्यास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रामुख्याने तरूण पिढीचा कल
अशाप्रकारे कार्यक्रम करण्याकडे जास्त दिसून येत आहे. लिंगायतांमध्ये बसव तत्व आचरणाविषयी जागरूकता निर्माण
करणे तसेच वचन साहित्याचा प्रचार, प्रसार करणे यासाठी फाउंडेशन कटिबध्द आहे. असे ही नावदगेरे म्हणाले.
अधिक माहितीसाठी फाउंडेशनचे अध्यक्ष सिध्दाराम नावदगेरे यांच्याशी 9272183231 या नंबरवर संपर्क साधावा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Basweshwar Jayanti 2023 | समतेची शरण चळवळ आणि महात्मा बसवण्णा