Lingayat Community | राज्यस्तरीय उच्च शिक्षीत लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा रविवारी पुण्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महात्मा बसवेश्वर वधु-वर सुचक केंद्र, कुपवाड (सांगली) Mahatma Basaveshwar Vadhu-Var Suchak Kendra, Kupwad (Sangli) तर्फे लिंगायत समाजातील (Lingayat Community) सर्व पोट जातींसाठी राज्यस्तरीय उच्च शिक्षीत लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 6 नोव्हेंबर दुपारी 12 वाजता सदाशिव पेठ येथील वेदशास्त्रोतेजक सभा येथे हा मेळावा संपन्न होणार आहे. अशी माहिती स्वागताध्यक्ष आप्पासाहेब शेगावे यांनी दिली. (Lingayat Community)
महात्मा बसवेश्वर वधु-वर सुचक केंद्र, कुपवाड (सांगली) तर्फे राज्यात विविध ठिकाणी उच्च शिक्षीत लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावे आयोजित करण्यात येतात.
रविवारी पुण्यात आयोजित मेळाव्याचे उद्घटन बसववादी सोशल फाउंडेशनचे विश्वस्त अनंत सिंदाळकर, भारतीय समतावादी पार्टीचे राष्ट्रीय सचिव बसवराज कनजे यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा बसवेश्वर नाट्य निर्माते राजेंद्र आलमखाने,
भारतीय समतावादी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश डिगोळे, जागतिक लिंगायत सभेचे अॅड. संदिप कुडते,
सिध्दरामेश नावदगेरे यांची उपस्थिती असेल. मेळाव्यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू आहे.
तसेच मेळाव्याच्या ठिकाणी देखील नोंदणी करण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी आप्पासाहेब शेगावे
यांच्याशी 9975185511 तसेच प्रियांका शेगावे यांच्याशी 8482802734 यानंबरवर संपर्क करावा. (Lingayat Community)
Web Title :- Lingayat Community | State Level Higher Education Lingayat Bride-Groom Parents Introduction Meet in Pune on Sunday
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update