Lingayat Dharma Sanskar Pune | ‘लिंगायत धर्म संस्कारानुसार विधी करणारे क्रियामुर्ती घडणे ही काळाची गरज’ – मल्लिकार्जुन मुलगे यांचे प्रतिपादन

क्रियामुर्ती प्रशिक्षण शिबीर संपन्न

 

पोलीसनामा ऑनलाइन : Lingayat Dharma Sanskar Pune | महात्मा बसवण्णांनी बाराव्या शतकात स्थापन केलेला लिंगायत धर्म हा विज्ञानाधिष्ठित धर्म असून यात कर्मकांडाला स्थान नाही. त्यामुळे त्याचे महत्व जाणून घेऊन लिंगायत धर्म संस्कारानुसार विधी होणे व ते करणारे क्रियामूर्ती घडणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन लिंगायत धर्म चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते व क्रियामूर्ती मल्लिकार्जुन मुलगे यांनी केले. (Lingayat Dharma Sanskar Pune)

 

 

 

 

लिंगायत धर्म संस्कार विधी प्रशिक्षण देण्यासाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, लिंगायत धर्माचे मूळ तत्वज्ञान अष्टावरण, पंचाचार व षटस्थल आहे. तसेच महात्मा बसवण्णा व शरणांनी लिहिलेले वचन साहित्य धर्म ग्रंथ आहे. क्रियामूर्ती होण्यापूर्वी या सर्व गोष्टींचे ज्ञान, अध्ययन असणे गरजेचे आहे. गर्भ लिंग संस्कार अर्थात डोहाळे जेवण, नामकरण, वाढदिवस, जावळ, ऋतुमती समारंभ, साखरपुडा, कल्याण महोत्सव अर्थात विवाह, नूतन वास्तू गुरूप्रवेश, नवीन उद्याेग प्रारंभ, अंत्यसंस्कार आदी सर्व विधी लिंगायत धर्म संस्कारानुसारच केल्या जाव्यात. त्यासाठी शरणांची विविध वचने ज्ञात असणे व ती पाठ असणे गरजेचे आहेत. क्रियामूर्ती अष्टावरण संपन्न असावी. वक्तृत्व कला अवगत असावी. असे ही मुलगे यांनी सांगितले. (Lingayat Dharma Sanskar Pune)

 

 

कार्यक्रमाच्या सुरूवातीला लिंगायत धर्म षटस्थल ध्वजारोहण झाले. महात्मा बसवण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक प्रार्थना व शरणांचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय समतावादी पार्टीचे राष्ट्रीय सचिव बसवराज कनजे यांनी केले. यावेळी लिंगायत धर्म संस्कार विधी करणार्या महिला क्रियामूर्ती अनिता मुलगे, कालिदास निंबाळे, राष्ट्रीय बसव दल, पुणे जिल्हा अध्यक्ष सतीशकुमार पाटील, बसव सेवा प्रतिष्ठानचे रविंद्र खुबा, संजय इंडे, चंद्रकांत हारकुडे, बसववादी सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष सिध्दराम नावदगेरे, भारतीय समतावादी पार्टीचे पिंपरी चिंचवड सरचिटणीस संगमेश्वर शिवपुजे, पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष चंद्रकांत खोचरे, बालाजी पाटील, एम. आर. पट्टनशेट्टी, परमेश्वर कामजवळगे, रविंद्र कवठे उपस्थित होते.

 

 

राष्ट्रीय बसव दलाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

मल्लिकार्जुन मुलगे व अन्य मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय बसव दल, पुणे जिल्हा तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय बसव दल, पुणे जिल्हा अध्यक्ष सतीशकुमार पाटील यांनी उपस्थितांना दिनदर्शिका भेट दिली.

 

 

Web Title :- Lingayat Dharma Sanskar Pune | ‘It is the need of the hour to create
Kriyamurtis who perform rituals according to Lingayat Dharma Sanskar’
– Assertion by Mallikarjuna Mulge

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा