लिंगायत आरक्षण आंदोलनाचे मुख्य शिल्पकार लिंगायत लोकनेते काकासाहेब कोयटे FB Live करत साधणार संवाद !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लिंगायत संघर्ष समितीच्या अथक प्रयत्नाने व हजारो कार्यकर्त्यांच्या तीव्र लढ्याने 6 वर्षांपूर्वी मिळालेले काही पोटजातींना आरक्षण व अल्पसंख्याक दर्जा ची शिफारस. या लिंगायत आरक्षण आंदोलनामुळे पेटून उठलेला लिंगायत समाज तसेच या आंदोलनाचा इतिहास व राहीलेल्या सर्वच पोटजातींना आरक्षण मिळाले पाहिजे यासाठीच्या पुढील लढ्याचे लिंगायत क्रांती दिनी रणशिंग फुंकले जाणार आहे.

यासाठी लिंगायत आरक्षण आंदोलनाचे मुख्य शिल्पकार लिंगायत लोकनेते काकासाहेब कोयटे हे
रविवार दि. 9 आँगस्ट रोजी सकाळी 11 वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्वांशी संवाद साधणार आहेत.