Lingayat Samaj Protest | मुंबईतील लिंगायत समाजाचा मोर्चा स्थगित, 70 ते 80 टक्के मागण्या पूर्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Lingayat Samaj Protest | लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा मिळावा तसेच समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदान (Azad Maidan) येथील मोर्चा मागे घेण्यात आला आहे. अविनाश भोसीकर (Avinash Bhosikar) आणि विनय कोरे (Vinay Kore) यांनी मोर्चा (Lingayat Samaj Protest) माघार घेत असल्याची घोषणा केली. समाजाच्या 70 ते 80 टक्के मागण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे आझाद मैदानावरील मोर्चा स्थगित करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काही केंद्राचे विषय आहेत त्या मागण्यासाठी लढाई पुढे सुरु राहील असेही भोसीकर यांनी सांगितले. (Lingayat Religion Mahamorcha)

 

22 जानेवारीला समाजाच्या मागण्यावर, आमची चर्चा झाली होती. यासंदर्भात आम्ही त्यांच्या काही मागण्यांवर सकारात्मक आहोत, त्या मान्य केल्या जातील. याचा पाठपुरवा स्वत: मी करणार आहे. काही मागण्या केंद्रातील सरकार (Central Government) संदर्भात आहेत, त्यावर पुढे अभ्यास आणि चर्चा करु, तो राष्ट्रीय निर्णय आहे, असे विनय कोरे म्हणाले. आमच्या 70 ते 80 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. त्याबद्दल सरकारचे आभार व्यक्त करतो, असेही अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे विजय हतुरे (Vijay Hature) यांनी म्हटले. (Lingayats Protest In Mumbai Maharashtra)

लिंगायत समाजाच्या मोर्चेकऱ्यांसोबत (Lingayat Samaj Protest) बोलण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी आले होते. यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या नावचं विद्यापीठ (Basaveshwar University) तयार करण्यासाठी मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली. ही मागणी राज्य सरकारने (Maharashtra State Government) मान्य केली आहे. महाराष्ट्र विधिमंडळात (Maharashtra Legislature) बसवेश्वरांचा पुतळा बसवण्याची मागणी केली होती, ती राज्य सरकारने मान्य केली. जागा शोधणं सुरु आहे. उपलब्ध झाली नाही तर तिथे तैलचित्र लावण्याचं मान्य करण्यात आल्याची माहिती विनय कोरे यांनी दिली.

 

काय आहेत प्रमुख मागण्या?
– लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता द्यावी. (Separate Lingayat Religion)
– राज्यातील लिंगायत धर्मियांना अल्पसंख्याक दर्जा जाहिर करावा
– सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुका येथे मंजूर असलेल्या महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरीत सुरु करावे.
– मुंबई येथील विधानभवन परिसरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा उभारावा
– महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे
– गांव तेथे रुद्रभूमी (स्मशानभुमी) आणि गांव तेथे अनुभव मंटप (सभामंडप) करण्यात यावे.
– लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह निर्माण करण्यात यावे.
– राष्ट्रीय जनगणनेत लिंगायतांसाठी स्वतंत्र कॉलम देण्यात यावा
– वीरशैव लिंगायत व हिंदू लिंगायत अशी नोंद असलेल्या ओबीसी (OBC) घटकामध्ये समावेश नाही, त्यामुळे या घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सरकारी नोकरीत संधी मिळत नाही. सरकारने शुद्धीपत्रक काढून ओबीसीमध्ये समावेश करावा.

 

Web Title :- Lingayat Samaj Protest | lingayat community maha morcha for demand religious minority status is adjourned in mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mahesh Landge | चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून आमदार महेश लांडगेंची सर्वपक्षीयांना भावनिक साद; म्हणाले…

Supriya Sule | ‘वंचित’ सोबतच्या युतीबाबत स्पष्टचं बोलल्या सुप्रिया सुळे; म्हणाल्या…

Amar Mulchandani ED Raid | कट रचून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अमर मूलचंदानी याच्यासह 6 जणांविरुद्ध ईडीकडून स्वतंत्र FIR