PM किसान सन्मान निधी स्कीम ! शेतीसाठी 6000 रूपये हवेत तर मग 30 नोव्हेंबरपुर्वी ‘हे’ काम नक्की करा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने ‘पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजने’चा हप्ता मिळण्यासाठी  आधार क्रमांक  लिंक करणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी सरकारने अंतिम तारीख  30 नोव्हेंबर 2019 ची तारीख निश्चित केली आहे. तर जम्मू-काश्मीर, लडाख, आसाम आणि मेघालयातील शेतकऱ्यांना ही मुदत  31 मार्च 2020 पर्यंत  वाढवून दिली आहे. जर आधार क्रमांक  लिंक करण्यास उशीर झाला तर त्या शेतकऱ्यांना 6000 रुपये शेतीसाठी मदत मिळणार  नाही.

किती शेतकर्‍यांना योजनेचा लाभ मिळाला  –

कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात 14.5 कोटी शेतकरी कुटुंबे आहेत. या सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याची योजना मोदी सरकारने आखली आहे. या योजनेअंतर्गत सुमारे  87 हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. आतापर्यंत 7.63 कोटी शेतकर्‍यांना याचा फायदा झाला आहे. मात्र यापैकी केवळ 3.69  कोटी लोकांना तिसरा हप्ता मिळाला आहे.

एकूणच सुमारे 7 कोटी लाभार्थी शेतकरी या योजनेच्या प्रतीक्षेत  आहेत. कागदापत्रांचा  घोळ आणि आधारकार्ड लिंक केलं  नसल्यामुळे बर्‍याच लोकांना पैसे मिळालेले नाहीत. अशा परिस्थितीत ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी वेळेत त्यांचा आधार लिंक करून घेतला तरच त्यांना  लाभ मिळणार आहे.

कोणताही शेतकरी नोंदणी करू शकतो

आपण देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला असेल आणि आतापर्यंत बँक खात्यात पैसे आले नाहीत, तर त्याची  स्थिती जाणून घेणे खूप सोपे झाले आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यादी राज्यांमधून येत असल्याने या योजनेनुसार पैसे जात आहेत. पंतप्रधान किसान पोर्टलला भेट देऊन कोणताही शेतकरी  आपला आधार, मोबाइल व बँक खाते क्रमांक देऊन आपली माहिती  प्राप्त करू शकतो.

योजनेचा लाभ  न मिळाल्यास या ठिकाणी करा तक्रार –

जर आपल्याला पैसे मिळाले नाहीत तर प्रथम आपल्या महसूल अधिकारी (लेखपाल) आणि त्या परिसरातील कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. मात्र  याठिकाणी काही कारवाई झाली नाही तर  केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या शेतकरी सहाय्य डेस्कला (PM-KISAN Help Desk) ([email protected]) ईमेल करा.

PM-KISAN Help Desk कडूनही प्रतिसाद मिळाला नाही तर  शेतकरी कक्षाच्या 011-23381092 (डायरेक्ट हेल्पलाइन) वर कॉल करा आणि आपली समस्या सांगा. एवढेच नव्हे तर या योजनेचे शेतकरी कल्याण विभागात संपर्क साधू शकतात.   फोन नंबर 011-2338240 (दिल्ली) 1 आहे, तर ईमेल आयडी ([email protected]) आहे.

Visit : Policenama.com