Link Aadhaar To Voter ID | केवळ एका SMS ने लिंक होईल वोटर आयडी कार्ड आणि आधार, 1950 वर कॉल करून सुद्धा मिळवू शकता ‘ही’ मोठी सुविधा

नवी दिल्ली – वृत्त संस्था – Link Aadhaar To Voter ID | निवडणूक सुधारणा कायदा नुकताच संसदेत मंजूर करण्यात आला. यामध्ये मतदार ओळखपत्र (voter ID card) आधार कार्ड (Aadhaar card) शी लिंक करण्याचा महत्त्वाचा नियम करण्यात आला आहे. हे पाऊल पूर्णपणे ऐच्छिक असेल आणि कोणताही मतदार स्वत:च्या इच्छेने मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक (voter id aadhaar card link) करू शकतो.

ही दोन्ही महत्वाची कागदपत्रे जोडून बनावट मतदार ओळखपत्र हटवता यावेत आणि निवडणूक सुधारणा करता याव्यात यासाठी सरकारने ही मोहीम अधिक तीव्र केली आहे.

मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक (voter id aadhaar card link) करण्यासाठी तीन पद्धती आहेत आणि तिन्ही अतिशय सोप्या आहेत. सरकारने राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP), एसएमएस आणि फोनद्वारे लिंक करण्याची सुविधा दिली आहे. यामध्ये, आपण प्रथम SMS द्वारे Voter ID आणि आधार लिंक कसे करायचे ते शिकू कारण ते फक्त तीन स्टेपमध्ये पूर्ण होते.

1- एसएमएसद्वारे मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक

  • तुमच्या मोबाईलमध्ये Messages अ‍ॅप उघडा
  • मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्यासाठी 166 किंवा 51969 वर मेसेज पाठवा
  • मेसेजमध्ये तुम्हाला लिहायचे आहे – ECILINK<space>EPIC No>space>Aadhaar No>. या संदेशासह तुमचा मतदार आयडी आधारशी लिंक केला जाईल

2- जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे काम फोन करूनही करू शकता. यासाठी भारत सरकारने कॉल सेंटरची सुविधा सुरू केली आहे. यासाठी तुम्हाला 1950 वर कॉल करून आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्राचा क्रमांक सांगावा लागेल. यानंतर तुमचे दोन्ही दस्तऐवज यशस्वीरित्या जोडले जातील.

3- मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक करण्यासाठी तुम्ही बुध स्तर अधिकारी किंवा BLO ची मदत घेऊ शकता. प्रत्येक मतदारसंघातील बूथवर हे अधिकारी नेमले जातात. BLO मतदार ओळखपत्राची माहिती गोळा करतात आणि मतदार ओळखपत्र बनवतात. तुम्ही बीएलओशी बोलूनही मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करू शकता.

अशी शिबिरे अनेक ठिकाणी आयोजित केली जातात ज्यात मतदार ओळखपत्र आधारशी लिंक केले जाते (मतदार ओळखपत्र आधार कार्ड लिंक). यासाठी तुम्हाला तुमचे मतदार ओळखपत्र आणि आधारची फोटो कॉपी बीएलओला द्यावी लागेल. या दोन कागदपत्रांच्या क्रमांकाच्या आधारे ते जोडले जातील.

Web Title : Link Aadhaar To Voter ID | link aadhaar card to voter id epic know
how to link aadhaar card to voter id epic through sms and phone

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Crime News | पोलीस वसाहतीमध्ये गृहरक्षक तरुणीने घेतले जाळून

7th Pay Commission Update | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील 2 लाख रुपये,
18 महिन्याच्या DA एरियर बाबत मोठे अपडेट

CP Amitabh Gupta | आज रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडिओ)

Zero Rupee Note In India | झीरो रुपयाची नोट छापण्याची भारतात का भासली होती गरज? जाणून घ्या कारण

Deltacron Corona Variant | कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘डेल्टाक्रॉन’ दाखल; डेल्टा आणि ओमिक्रॉन आले एकत्र मग…