Link DL With Aadhaar | आतापर्यंत केले नसेल तर आजच करा ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ आधारसोबत लिंक, जाणून घ्या एकदम सोपी प्रोसेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड आता जवळपास सर्वच कागदपत्रांसोबत लिंक (link your driving license with aadhaar card) केले जात आहे. पॅन कार्ड आणि दुसर्‍या कागदपत्रांसोबत ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा आधारसोबत लिंक (link your driving license with aadhaar card) करण्यासाठी सरकारने सांगितले आहे. यातून चालकांना सरकारच्या कॉन्टॅक्टलेस सर्व्हिसेसचा लाभ मिळू शकतो.

सोबतच पोलिसांचे कामसुद्धा सोपे होईल. उदाहरणार्थ जर कुणी आरोपी अ‍ॅक्सीडेंट करून फरार झाला तर त्याला शोधणे सोपे होईल. आता प्रश्न हा आहे की हे कसे करायचे?

आधारसोबत ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करण्याची प्रोसेस जाणून घेवूयात (link your driving license with aadhaar card)

– लायसन्स आधारसोबत लिंक करण्यासाठी राज्य परिवहन विभागाच्या वेबसाइटवर जा.

येथे लिंक आधारवर क्लिक करून ड्रॉप-डाऊन मेनूमधून ड्रायव्हिंग लायसन्स निवडा.

यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाका आणि Get Details वर क्लिक करा.

येथे आपला 12 अंकांचा आधार नंबर आणि मोबाइल नंबर टाका.

ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी सबमिटवर क्लिक करा.

नंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.

आता ओटीपी टाकून ड्रायव्हिंग लायसन्सला आधारसोबत लिंक करण्याची प्रोसेस पूर्ण करा.

Web Title :- Link DL With Aadhaar | link your driving license with aadhaar card at home like this know the whole process

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Thane Crime | औरंगाबादमधील पोलिस कर्मचार्‍याचा मृतदेह ठाण्यातील फुटपाथवर आढळल्याने प्रचंड खळबळ

Maharashtra Rains | राज्यात पावसामुळे आठवडयात 213 जणांचा मृत्यू तर 61280 पाळीव जनावरे मृत्युमुखी; 435879 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

Tokyo Olympics | शेवटच्या तीन मिनिटात केली कमाल, गत विजेत्या अर्जेटिनावर भारताची 3-1 अशी मात; उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश