PAN Card-Aadhaar ला जोडा अन्यथा होईल 1 हजाराचा दंड, 31 मार्च ही शेवटची संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पॅन कार्ड आता आधार कार्डशी जोडणे बंधनकारक केले आहे. पॅन आधारशी लिंक करण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत मुदत दिली आहे. तसे न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. तसेच आधारला पॅन कार्ड जोडलेले नसेल आणि त्याचा कुठे उपयोग केल्यास दंडसुद्धा होणार आहे. हे दंड 1 हजार रुपयांपर्यंत होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी केंद्र सरकारने पॅन कार्ड आधारशी जोडण्यासाठी अनेकवेळा मुदत वाढवली आहे, पण आता तसे न केल्यास दंड आकारण्याची तरतूद केली गेली आहे. दरम्यान मंगळवारी (दि. 23) लोकसभेत वित्त विधेयक 2021 पास केले आहे. ज्यात आयकर कायदा 1961 मधील नवीन कलम 234 एच च्या अंतर्गत नवीन तरतूद केली आहे.

पॅन कार्डशी आधार लिंक नसल्यास, नागरिकांना आता जास्तीत जास्त 1 हजारांपर्यत दंड भरावा लागेल. तसेच नागरिकांचे पॅन कार्ड अवैध ठरवल्यानंतर ज्या अडचणी निर्माण होतील, त्याला ते स्वत: जबाबदार राहतील, असे स्पष्ट केले आहे.