Link PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली विशेष ऑफर, परंतु अगोदर करावे लागेल ‘हे’ महत्वाचे काम
नवी दिल्ली : LIC चा IPO या तिमाहीत येण्याची अपेक्षा आहे. सरकारने IPO साठी सर्व तयारी केली आहे. LIC चे पॉलिसी होल्डर सुद्धा आयपीओ खरेदी करू शकतील. यासाठी कंपनी त्यांना ऑफर (Link PAN to LIC Policies) देत आहे. कंपनी आयपीओमध्ये त्यांचा कोटा ठरवू शकते. जेणेकरून त्यांना सहज शेयर खरेदी करण्याची संधी मिळेल. परंतु यापूर्वी जे सर्वात आवश्यक काम तुम्हाला करायचे आहे ते म्हणजे, आपले PAN पॉलिसीसोबत लिंक करून घ्या. (Link PAN to LIC Policies)
कंपनीने लोकांना म्हटले आहे की, त्यांच्या प्रस्तावित प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (आयपीओ) मध्ये भागीदारीसाठी आपला कायम खाते क्रमांक (पॅन) ‘अपडेट’ करा. यासोबतच प्रस्तावित योजनेनुसार, एलआयसीच्या आयपीओच्या 10 टक्केपर्यंत पॉलिसीधारकांसाठी आरक्षित असेल.
एलआयसीने म्हटले की, अशा कोणत्याही सार्वजनिक प्रारंभिक ऑफरमध्ये भाग घेण्यासाठी पॉलिसीधारकांना हे ठरवावे लागेल की, त्यांच्या पॅनची माहिती कंपनीच्या रेकॉर्डमध्ये ‘अपडेट’ असावी. देशात कोणत्याही सार्वजनिक ऑफरचे सदस्यत्व तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमच्याकडे वैध डिमॅट खाते असेल.
वक्तव्यात हे सुद्धा म्हटले आहे की, एलआयसी पॉलिसी धारकांना जाहिरातीद्वारे पॅन अपडेटची माहिती देत आहे,
कारण या प्रस्तावित आयपीओच्या भागीदारीसाठी केवायसी (KYC) च्या दृष्टिकोणातून महत्वपूर्ण आहे.
एलआयसीने हे सुद्धा स्पष्ट केले आहे की, हे लेटर पॉलिसी होल्डर्सला आयपीओ मिळण्याची गॅरंटी नाही.
सोबतच हे सुद्धा म्हटले की, आयपीओसाठी डिमॅट अकाऊंट असणे आवश्यक आहे. डिमॅट अकाऊंटसाठी ब्रोकरेज फर्म्सकडे संपर्क करावा लागेल.
काय आहे प्रोसेस
– वेबसाइट https://licindia.in/Home/Online-PAN-Registration वर सहजपणे PAN अपडेट होईल.
– पॉलिसीच्या लिस्टसोबत आपले पॅनकार्ड सांभाळून ठेवा.
– मोबाईल नंबर टाकावा लागेल.
– एलआयसीमध्ये नोंदलेल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल.
– फॉर्म जमा केल्यानंतर, रजिस्ट्रेशनच्या यशस्वी झाल्याचा एक संदेश येईल.
Web Title :- Link PAN to LIC Policies | pan lic policy linking know how to link your pan to your lic policies full process
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime | पुण्यात PMPML बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात गॅप, बस चालकाविरुद्ध FIR
- New Wage Code | वेतन वाढीच्या आनंदावर ‘टाच’ येण्याची शक्यता; हाताशी येणार्या पगारात कपात?
- Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 782 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी