6 कोटी PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी ! EPFO कडून महत्वाच्या नियमात बदल, जाणून घ्या अन्यथा नाही मिळणार पैसे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ६ कोटी पीएफ pf खातेधारकांना अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एका महत्त्वाच्या नियमात बदल केला आहे.
जो बदल नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
प्रत्येक खातेधारकाचं pf पीएफ pf खातं आधार कार्डला लिंक असणं आवश्यक असणार आहे.
ही जबाबदारी तुम्हाला नियुक्त करणाऱ्या कंपनीची असणार आहे, त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला याबाबत सूचना देणं आवश्यक असेल.
या नियमाचं पालन न केल्यास तुमच्या अडचणी वाढू शकतात.
EPFO has amended ECR filing protocol and from 01.06.2021 it can be filed only with respect to Aadhaar seeded UAN's.#EPFO #SocialSecurity #HumHainNa pic.twitter.com/8KCAmRMNEC
— EPFO (@socialepfo) June 7, 2021
१ जूनपासून नियम लागू
ईपीएफओने याविषयी एम्प्लॉयर्ससाठी एक नोटिफिकेशन देखील जारी केलं आहे.
नोकरी देणाऱ्या कंपनीने हे काम केलं नाही तर सब्सक्रायबर्सच्या खात्यात एम्प्लॉयरचे योगदान थांबवले जाऊ शकते.
सब्सक्रायबर्सचे UAN (Universal account number) आधारसह लिंक असणं आवश्यक आहे.
EPFO ने Social Security code २०२० च्या सेक्शन १४२ मध्ये बदल केला आहे.
यामुळे ECR फाइलिंग प्रोटोकॉल बदलला आहे. याबाबत ट्वीट करुनही EPFO ने माहिती दिली आहे.
–
आधार कार्डशी लिंक नसल्यास होईल नुकसान
या नियमानंतर ईपीएफ खातेधारकाचं (Epfo account holders) खातं आधार कार्डाशी जोडलेलं नसेल तर ईपीएफ खात्यामध्ये एम्प्लॉयरचे योगदान जमा होणार नाही.
त्यामुळे जर तुम्ही तुमच्या पीएफ pf खात्याशी आधार कार्ज लिंक केलं नसेल तर लवकरात लवकर हे काम पूर्ण करा.
ईपीएफओने हे स्पष्ट केलं आहे की, ईपीएफची रक्कम अशा खात्यात जमा नाही होणार ज्याचे यूएएन आधारशी लिंक नसेल.
EPFO ने काय म्हटलं आहे ?
EPFOने नवीन मार्ददर्शक सूचना जारी करताना असे म्हटेल आहे की- प्रिय नियोक्ता, सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० च्या कलम १४२ लागू होण्यासह ECR केवळ त्याच सदस्यांच्या खात्यात दाखल करण्याची अनुमती आहे, ज्यांचा आधार नंबर आहे.०१.०६.२०२१ पासून यूएएनसह आधार जोडलेले हवे. नियमानुसार सर्व योगदानकर्त्या सदस्यांसंदर्भात आधार सीडिंग सुनिश्चित करा, जेणेकरुन त्यांना ईपीएफओ संबंधित सेवांचा लाभ घेता येईल.
आधारशी तुमचे EPF खाते कसे जोडाल ?
– सर्वात आधी EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर जा
– याकरता https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ यावर क्लिक करू शकता.
– यानंतर UAN आणि पासवर्ड प्रविष्ट करुन लॉग इन करा
– त्यानंतर Manage सेक्शनमध्ये KYC या पर्यायावर क्लिक करा
– याठिकाणी तुम्हाला EPF अकाउंटमध्ये आधारसह कोणती कागदपत्र जोडणं आवश्यक आहे ते दिसेल
– याठिकाणी आधारचा पर्याय निवडून आधार नंबर आणि आधारवरील तुमचं नाव टाइप करुन सर्व्हिसवर क्लिक करा
– यानंतर तुम्ही दिलेली माहिती सुरक्षित होईल आणि तुमचं आधार UIDAI डेटाशी व्हेरिफाय होईल
– तुम्ही दिलेली कागदपत्र योग्य असल्यास तुमचं आधार EPF खात्याशी लिंक होईल.
Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत