‘किसान क्रेडिट कार्ड’ला ३१ जुलैपर्यंत ‘आधार’ कार्ड लिंक करणे ‘अनिवार्य’, अन्यथा मिळणार नाही ‘लाभ’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – जर तुम्ही शेतकरी असाल आणि किसान क्रेडिड कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतंत्य महत्वाची आहे. आयसीआयसीआय बँकेने आपल्या केसीसी धारकांना सूचना दिल्या आहे की ३१ जुलैपर्यंत आधार लिंक करण्यास सांगितले आहे. जर तुम्ही आधार कार्ड लिंक केले नाहीत तर तुम्हाला पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार नाही.

खरिप विमा योजनेत समस्या येण्याची शक्यता –
आपल्या किसान क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना आयसीआयसीआयने सांगितले आहे की, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप पीकांचा विमा बँकेच्या माध्यामातून देण्यात येणार आहे. बँकेने सूचनेत सांगितले आहे की वीम्यासाठी प्रीमियमची रक्कम केसीसी खात्यात देण्यात येते. खरीप पीक विमा योजनेसाठी अंतिम तारिख ३१ जुलै २०१९ असणार आहे. म्हणूनच जर तुम्ही केसीसीला आधार कार्ड लिंक केले नसेल तर जे लवकरच करा. याची अंतिम तारीख ३१ जुलै असणार आहे. आधार लिंक केले तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. बँकेने सूचनेत सांगितले आहे की केसीसी ग्राहक आपल्या शाखेत जाऊन आधार लिंक करु शकतात.

आधार लिंक न केल्यास मिळणार नाही लाभ –
बँकेने सांगितल्यानुसार खरीप विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी केसीसी आधार कार्डला जोडणी आवश्यक आहे. बँकेनुसार, जर एखाद्या शेतकऱ्यांने आधार कार्ड लिंक केले नाही तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यांना खरीप हंगामाच्या पीक विमा योजनेचा लाभ मिळणार नाही.
त्यामुळे याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड केसीसीला जोडा जेणे करुन तुम्ही खरीप पीक विमा योजनेचा लाभ घेऊ शकाल.

आरोग्यविषयक वृत्त –