Lions Veterans Cup” T-20 Cricket | गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक्नॉलॉजी, स्वयुश स्ट्रायकर्स, बाश्री बास्टर्स, नवले वॉरीयर्स संघांनी उद्धघाटनाचा दिवस गाजवला !!

लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ ‘लायन्स् प्रौढ करंडक’ टी-२० क्रिकेट २०२३ स्पर्धा

पुणे : Lions Veterans Cup” T-20 Cricket | लायन्स् क्लब पुणे रहाटणी तर्फे आयोजित लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ ‘लायन्स् प्रौढ करंडक’ (४० वर्षावरील गट) टी-२० क्रिकेट स्पर्धेत गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक्नॉलॉजी, स्वयुश स्ट्रायकर्स, बाश्री बास्टर्स आणि नवले वॉरीयर्स यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उद्धघाटनाचा दिवस गाजवला. (Lions Veterans Cup” T-20 Cricket)

मोशी येथील हजारे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स् येथील मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत महेश शिंदे याच्या भेदक गोलांदाजीच्या जोरावर गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक्नॉलॉजी संघाने लवासा रॉयल्स् संघाचा ४ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना लवासा रॉयल्स् संघाला १२१ धावा जमविता आल्या. महेश शिंदे याने ९ धावात ४ गडी टिपले. हे आव्हान गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक्नॉलॉजीने १८.३ षटकात पूर्ण केले. (Lions Veterans Cup” T-20 Cricket)

निखील राईकर याच्या ८७ धावांच्या जोरावर स्वयुश स्ट्रायकर्स संघाने रॉयल पासलकर संघाचा ४८ धावांनी पराभव केला. शैलेश देशपांडे याच्या ७७ धावांच्या जोरावर नवले वॉरीयर्स संघाने दिक्षित रॉयल्स् संघाचा २ गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली. कर्णधार फैयाझ लांडगे याच्या ६८ धावांच्या जोरावर बाश्री बास्टर्स संघाने डिएमटीसी अँड न्युक्लियस इलेव्हन संघाचा १७ धावांनी पराभव केला.

लायन सागर ढोमसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या स्पर्धेचे उद्धघाटन डिस्ट्रीक्ट ३२३४डी२ क्लबचे क्रिकेटचे अध्यक्ष अभिषेक मोहीते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेसळी लायन्स् क्लब पुणे रहाटणीचे अध्यक्ष धीरज कदम, सचिव हेमंत रसाळ आणि खजिनदार शिवाजी माने, वसंतभाऊ कोकणे, विजय कोतवाल आणिसमीर अगरवाल आदि मान्यवर उपस्थित होते.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

लवासा रॉयल्स्ः १७ षटकात १० गडी बाद १२१ धावा (अजित पाटील ३४, बाबा एन. २८, महेश शिंदे ४-९,
मनोज मराठे २-२३, अनिल मांडके २-२८) पराभूत वि. गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक्नॉलॉजीः १८.३ षटकात ६
गडी बाद १२२ धावा (गणेश कुदळे २८, प्रफुल्ल मानकर २५, बाबा एन. २-२३); सामनावीरः महेश शिंदे;

रॉयल पासलकरः २० षटकात ५ गडी बाद १६७ धावा (निखील राईकर ८६ (५७, ११ चौकार, २ षटकार),
अभिषेक मोहीते ४१, सचिन कापडे २-३४, समीर तांबोळी २-१९) पराभूत वि. स्वयुश स्ट्रायकर्सः २० षटकात ८
गडी बाद ११९ धावा (राहूल कामठे २८, समीर तांबोळी २३, सतिश सावंत २-२४, प्रमोद पैलवाल २-२०); सामनावीरः
निखील राईकर;

दिक्षित रॉयल्स्ः २० षटकात ६ गडी बाद १६७ धावा (अमित पार्ले ५८ (४७, ९ चौकार, १ षटकार), महेश दिवटे ३०, अप्लेश गुजराथी नाबाद २०, विजय नवले २-२२, मनोहर पाटील २-३१) पराभूत वि. नवले वॉरीयर्सः १९.४ षटकात ८ गडी बाद १६९ धावा (शैलेश देशपांडे ७७ (४०, १ चौकार, ८ षटकार), रोहीत बंदीदिवे २९, मनोहर पाटील नाबाद २८, पुष्कराज जोशी ३-२९, महेश दिवटे २-११); सामनावीरः शैलेश देशपांडे;

बाश्री बास्टर्सः २० षटकात २ गडी बाद १८० धावा (फैयाझ लांडगे नाबाद ६८ (३२, ९ चौकार, २ षटकार),
सचिन जयवंत ६३ (५४, ६ चौकार), नितेश गुंदेचा ३१) वि.वि. डिएमटीसी अँड न्युक्लियस इलेव्हनः २० षटकात
६ गडी बाद १६३ धावा (सुरेश भोसले ४६, वसंत कोकणे ३०, धीरज कदम २१, प्रशांत तुपे २-१९, संतोष जाधव २-३४);
सामनावीरः फैयाझ लांडगे.

Web Title :-   Lions Veterans Cup” T-20 Cricket | Gargi Educon and Smart Technology, Swayush Strikers, Bashree Basters, Navale Warriors celebrated the opening day

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aruna Irani | रेखा यांच्याबद्दल अरुणा इराणींचा धक्कादायक खुलासा; तब्बल 42 वर्षांनंतर केला खुलासा

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll election | विधानसभा पोटनिवडणूक : चिंचवड मतदारसंघासाठी 510 तर कसबा पेठ मतदारसंघासाठी 270 मतदान केंद्रे