लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ ‘लायन्स् प्रौढ करंडक’ टी-२० क्रिकेट २०२३ स्पर्धा
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Lions Veterans Cup” T-20 Cricket | लायन्स् क्लब पुणे रहाटणी तर्फे आयोजित लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ ‘लायन्स् प्रौढ करंडक’ (४० वर्षावरील गट) टी-२० क्रिकेट स्पर्धेत गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक्नॉलॉजी संघाने सलग दुसरा विजय मिळवला. लवासा रॉयल्स् आणि रॉयल पासलकर या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. (Lions Veterans Cup” T-20 Cricket)
मोशी येथील हजारे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स् येथील मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत भुषण देशपांडे याच्या नाबाद ५१ धावांच्या जोरावर गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक्नॉलॉजी संघाने गतविजेत्या दिक्षित रॉयल्स् संघाचा २३ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक्नॉलॉजी संघाने १५५ धावा धावफलकावर लावल्या. भुषण देशपांडे याने नाबाद ५१ धावांची तर, श्रीनिवास सरवदे याने ५३ धावांची खेळी केली. या आव्हानाला उत्तर देताना दिक्षित रॉयल्स् संघाने १३२ धावा जमविल्या. (Lions Veterans Cup” T-20 Cricket)
सिकंदर पाटील याच्या नाबाद ६० धावांच्या जोरावर लवासा रॉयल्स् संघाने स्वयुश स्ट्रायकर्स संघाचा ८ गडी राखून सहज पराभव केला. स्वयुश स्ट्रायकर्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १२१ धावा धावफलकावर लावल्या. सिकंदर पाटील याच्या नाबाद ६० धावांच्या कामगिरीमुळे हे आव्हान लवासा रॉयल्स्ने १०.५ षटकात पूर्ण केले. योगेश वाघ (३४ धावा) आणि पंकज पाटील (नाबाद २१ धावा) यांनीही धावा जमवून संघाचा विजय सोपा केला.
निखील राईकर याच्या ८६ धावांच्या जोरावर रॉयल पासलकर संघाने स्वयुश स्ट्रायकर्स संघाचा ४८ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
स्वयुश स्ट्रायकर्सः २० षटकात ९ गडी बाद १२१ धावा (सुनिल रोहेला २४, भुपेंद्रसिंग धुल्लट २८, अजित पाटील ३-१८, बाबा एन. ३-२३) पराभूत वि. लवासा रॉयल्स्ः १०.५ षटकात २ गडी बाद १२२ धावा (सिकंदर पाटील नाबाद ६० (३१, १० चौकार, १ षटकार), योगेश वाघ ३४, पंकज पाटील नाबाद २१); सामनावीरः सिकंदर पाटील;
गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक्नॉलॉजीः २० षटकात ३ गडी बाद १५५ धावा (भुषण देशपांडे नाबाद ५१ (५५, ६ चौकार),
श्रीनिवास सरवदे ५३ (३०, ३ चौकार, ४ षटकार), प्रशांत घेवरी २-२३) वि.वि. दिक्षित रॉयल्स्ः २० षटकात ८ गडी बाद
१३२ धावा (प्रभु अंजल ४१, सतिश सुरेश २३, प्रफुल्ल मानकर ३-२०, भुषण देशपांडे २-२२); सामनावीरः भुषण देशपांडे;
रॉयल पासलकरः २० षटकात ५ गडी बाद १६७ धावा (निखील राईकर ८६ (५७, ११ चौकार, २ षटकार),
अभिषेक मोहीते ४१,
सचिन कापडे २-३४, समीर तांबोळी २-१९) वि. वि. स्वयुश स्ट्रायकर्सः २० षटकात ८ गडी बाद ११९ धावा
(राहूल कामठे २८, समीर तांबोळी २३, सतिश सावंत २-२४, प्रमोद पैलवाल २-२०); सामनावीरः निखील राईकर.
Web Title :- Lions Veterans Cup” T-20 Cricket | Gargi Educon & Smart Technology 2nd win in a row; Lavasa Royals, Royal Pasalkar open to victory
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
WPL 2023 Schedule | 4 मार्चपासून रंगणार महिला आयपीएलचा थरार; 5 संघांमध्ये पार पडणार चुरस
BCCI | बीसीसीआय लवकरच करणार मोठी घोषणा; ‘या’ खेळाडूंना लागेल लॉटरी तर ‘हे’ खेळाडू होऊ शकतात बाहेर