Lions Veterans Cup T-20 Cricket | लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ ‘लायन्स् प्रौढ करंडक’ टी-२० क्रिकेट २०२३ स्पर्धा; लवास रॉयल्स्, बाश्री ब्लास्टर्स संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Lions Veterans Cup T-20 Cricket | लायन्स् क्लब पुणे रहाटणी तर्फे आयोजित लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ ‘लायन्स् प्रौढ करंडक’ (४० वर्षावरील गट) टी-२० क्रिकेट स्पर्धेत लवास रॉयल्स् आणि बाश्री ब्लास्टर्स संघांनी प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. (Lions Veterans Cup T-20 Cricket)

 

मोशी येथील हजारे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स् येथील मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत दर्शन वानगे याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर लवास रॉयल्स् संघाने रॉयल्स् पासलकर संघाचा ३१ धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना लवास रॉयल्स् संघाने १५५ धावा धावफलकावर लावल्या. सिकंदर पाटील याने ५४ धावा केल्या. संग्राम पाटील (२७ धावा) आणि योगेश वाघ (२५ धावा) यांनी धावंचे योगदान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल्स् पासलकर संघाचा डाव १२४ धावांवर मर्यादित राहीला. देवदत्त देवकर (४३ धावा) आणि विजय कोतवाल (२७ धावा) यांची खेळी संघाचा पराभव वाचवू शकली नाही. दर्शन वानगे याने १८ धावात ४ गडी बाद केले. (Lions Veterans Cup T-20 Cricket)

प्रतिक कैलाश याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर बाश्री ब्लास्टर्स संघाने गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक्नॉलॉजीचा ९ गडी राखून सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली.
गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक्नॉलॉजीने पहिल्यांदा फलंदाजी करताना १४० धावा धावफलकावर लावल्या.
भुषण देशपांडे याने ५५ धावांची खेळी केली. प्रतिक कैलाश याने ३० धावात ३ गडी बाद केले.
हे आव्हान बाश्री ब्लास्टर्स संघाने १७.४ षटकात व १ गडी गमावून पूर्ण केले. सचिन जयवंत याने नाबाद ५० धावा,
अतुल भगत याने नाबाद ३५ धावा आणि निलेश गुंदेचा याने २६ धावांचे योगदान देत संघाचा विजय साकार केला.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः उपांत्य फेरीः
लवास रॉयल्स्ः २० षटकात ६ गडी बाद १५५ धावा (सिकंदर पाटील ५४ (४७, ३ चौकार, ३ षटकार), संग्राम पाटील २७,
योगेश वाघ २५, विजय कोतवाल २-३०) वि.वि. रॉयल्स् पासलकरः १९ षटकात १० गडी बाद १२४ धावा (देवदत्त देवकर ४३, विजय कोतवाल २७,
दर्शन वानगे ४-१८, अजित पाटील २-२४); सामनावीरः दर्शन वानगे;

 

गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक्नॉलॉजीः २० षटकात ८ गडी बाद १४० धावा (भुषण देशपांडे ५५ (४२, ४ चौकार,
३ षटकार), राजेंद्र मदूे १८, प्रतिक कैलाश ३-३०, फैयाझ लांडगे २-२९, संतोष जाधव २-३०) पराभूत वि. बाश्री ब्लास्टर्सः
१७.४ षटकात १ गडी बाद १४२ धावा (सचिन जयवंत नाबाद ५० (५१, ४ चौकार), अतुल भगत नाबाद ३५,
निलेश गुंदेचा २६); सामनावीरः प्रतिक कैलाश.

 

Web Title : – Lions Veterans Cup T-20 Cricket | ‘Lions Adult Trophy’ T20 Cricket 2023 tournament in memory of Lion Sagar Dhomse; Lavas Royals, Bashri Blasters fight for the title

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rana Daggubati | ‘राणा नायडू’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित; पहिल्यांदाच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील काका पुतण्याची जोडी प्रेक्षकांसमोर

Police Inspector Transfer | नाशिक परिक्षेत्रामधील 7 पोलिस निरीक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या

Chhagan Bhujbal | उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर…, छगन भुजबळांचे मोठे विधान (व्हिडिओ)