Lions Veterans Cup” T-20 Cricket | लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ ‘लायन्स् प्रौढ करंडक’ टी-२० क्रिकेट २०२३ स्पर्धा ! बाश्री ब्लास्टर्स, रॉयल पासलकर संघांचा सलग दुसरा विजय

0
282
Lions Veterans Cup
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Lions Veterans Cup” T-20 Cricket | लायन्स् क्लब पुणे रहाटणी तर्फे आयोजित लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ ‘लायन्स् प्रौढ करंडक’ (४० वर्षावरील गट) टी-२० क्रिकेट स्पर्धेत बाश्री ब्लास्टर्स आणि रॉयल पासलकर या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. (Lions Veterans Cup” T-20 Cricket)

 

मोशी येथील हजारे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स् येथील मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत अतुल भगत याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बाश्री ब्लास्टर्स संघाने नवले वॉरीयर्स संघाचा ११ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना बाश्री ब्लास्टर्स संघाने १५० धावांचे आव्हान उभे केले. अतुल भगत याने ५० धावा आणि विद्यानंद बोंद्रे याने २७ धावांची खेळी केली. या दोघांनी दुसर्‍या गड्यासाठी ६४ चेंडूत ९७ धावांची भागिदारी केली. या आव्हानाला उत्तर देताना नवले वॉरीयर्स संघाचा डाव १३९ धावांवर मर्यादित राहीला. (Lions Veterans Cup” T-20 Cricket)

 

विजय कोतवाल याच्या भेदक गोलंदाजीच्या रॉयल्स् पासलकर संघाने डिएमटीसी अँड न्युक्लियस इलेव्हन संघाचा ६ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना डिएमटीसी अँड न्युक्लियस इलेव्हन संघाने १७४ धावा धावफलकावर लावल्या. धीरज कदम याने नाबाद ५५ धावा आणि सौरभ रवालिया याने ४६ धावा आणि सुरेश भोसले याने २८ धावांचे योगदान दिले. विजय कोतवाल याने १६ धावात ३ गडी बाद करून चमकदार गोलंदाजी केली. रॉयल्स् पासलकर संघाने हे आव्हान १७.५ षटकात व ४ गडी गमावून पूर्ण केले. अभिषेक मोहीते (नाबाद ३६ धावा), निलेश पासालकर (३३ धावा), सतिश सावंत (नाबाद २९ धावा), देवदत्त देवकर (२४ धावा) आणि निखील राईकर (२४ धावा) यांनी छोट्या धावसंख्येच्या खेळी करत संघाचा विजय साकार केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
बाश्री ब्लास्टर्सः २० षटकात ७ गडी बाद १५० धावा (अतुल भगत ५० (३७, ७ चौकार, १ षटकार), विद्यानंद बोंद्रे २७,
समाधान दांडेकर २-२०, मनोहर पाटील २-२२);(भागिदारीः दुसर्‍या गड्यासाठी अतुल आणि विद्यानंद यांच्यामध्ये ९७ (६४)
वि.वि. नवले वॉरीयर्सः २० षटकात ६ गडी बाद १३९ धावा (शैलेश देशपांडे नाबाद ४५, कुंदन जाचक १८,
संतोष जाधव २-३७); सामनावीरः अतुल भगत;

 

डिएमटीसी अँड न्युक्लियस इलेव्हनः २० षटकात ५ गडी बाद १७४ धावा (धीरज कदम नाबाद ५५ (४१, ७ चौकार,
१ षटकार), सौरभ रवालिया ४६, सुरेश भोसले २८, विजय कोतवाल ३-१६) पराभूत वि. रॉयल्स् पासलकरः १७.५ षटकात
४ गडी बाद १७६ धावा (अभिषेक मोहीते नाबाद ३६, निलेश पासालकर ३३, सतिश सावंत नाबाद २९, देवदत्त देवकर २४,
निखील राईकर २४); सामनावीरः विजय कोतवाल.

 

Web Title :- Lions Veterans Cup” T-20 Cricket | Lions Veterans Cup” T-20 Cricket Bashri Blasters, Royal Pasalkar teams second straight win

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Khadse | ‘…त्यावेळी भाजपला बिनविरोधची आठवण झाली नाही;’ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची भाजपवर टीका

Prakash Ambedkar | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले…

Pune Crime News | चोर्‍या करणार्‍या तडीपार गुन्हेगाराकडून 3 गुन्हयांची उकल; समर्थ पोलिसांची कामगिरी