Lions Veterans Cup T-20 Cricket | लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ ‘लायन्स् प्रौढ करंडक’ टी-२० क्रिकेट २०२३ स्पर्धा; लवास रॉयल्स् संघाला विजेतेपद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Lions Veterans Cup T-20 Cricket | लायन्स् क्लब पुणे रहाटणी तर्फे आयोजित लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ ‘लायन्स् प्रौढ करंडक’ (४० वर्षावरील गट) टी-२० क्रिकेट स्पर्धेत लवास रॉयल्स् संघाने बाश्री ब्लास्टर्स संघाचा पराभव करत विजेतेपदाला गवणसी घातली. (Lions Veterans Cup T-20 Cricket)

 

मोशी येथील हजारे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स् येथील मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात योगेश वाघ याच्या ६३ धावांच्या जोरावर लवास रॉयल्स् संघाने बाश्री ब्लास्टर्स संघाचा ७ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना बाश्री ब्लास्टर्स संघाला २० षटकामध्ये १३७ धावा धावफलकावर लावल्या. ज्ञानेश झेंडे (४८ धावा), अतुल भगत (नाबाद ३३ धावा) आणि सुधीर साठे (२५ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. हे आव्हान लवास रॉयल्स् संघाने १४.३ षटकात व ३ गडी गमावून पूर्ण केले. योगेश वाघ याने ३८ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६३ धावांची खेळी साकारली. श्रीधर प्रभू (२५ धावा) आणि सिकंदर पाटील (२१ धावा) यांनी दुसर्‍या बाजूने योग्य साथ दिली व संघाने विजेतेपदावर नाव कोरले. (Lions Veterans Cup T-20 Cricket)

स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमजेएफचे प्रदेशाध्यक्ष डॉ. दिलीपसिंग मोहीते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डिस्ट्रीक्ट ३२३४डी२ क्लबचे क्रिकेटचे अध्यक्ष अभिषेक मोहीते, अशोक बनसोडे, धनराज मंगहामणी, शैलेश आपटे आदि मान्यवर उपस्थित होते.

विजेत्या लवास रॉयल्स् संघाला आणि उपविजेत्या बाश्री ब्लास्टर्स संघाला करंडक आणि मेडल्स् देण्यात आली. मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रफुल्ल मानकर, सर्वोत्कृष्ट फलंदाज योगेश वाघ, सर्वोत्कृष्ट गोलंदाज विजय कोतवाल, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक महेश दिवटे, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक प्रभोद अंजल अशी वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः अंतिम सामनाः
बाश्री ब्लास्टर्सः २० षटकात ३ गडी बाद १३७ धावा (ज्ञानेश झेंडे ४८, अतुल भगत नाबाद ३३, सुधीर साठे २५,
रतन खारोल १-२२) पराभूत वि. लवास रॉयल्स्ः १४.३ षटकात ३ गडी बाद १३९ धावा (योगेश वाघ ६३ (३८, ७ चौकार,
२ षटकार), श्रीधर प्रभू २५, सिकंदर पाटील २१, प्रतिक कैलाश १-४); सामनावीरः योगेश वाघ;

 

तिसर्‍या क्रमांकासाठीः
गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक्नॉलॉजीः १५ षटकात ५ गडी बाद ११० धावा (श्रीनिवास सरवदे २९, अनिल मांडके नाबाद २०,
प्रफुल्ल मानकर २१, सतिश सावंत २-१८) वि.वि. रॉयल पासलकरः १४ षटकात १० गडी बाद १०८ धावा (अभिषेक मोहीते ३१,
देवदत्त देवकर २३, प्रफुल्ल मानकर ३-५, शोएब सय्यद ३-१५); सामनावीरः प्रफुल्ल मानकर;

 

Web Title :- Lions Veterans Cup T-20 Cricket | Lions Veterans Cup T-20 Cricket – Lavas Royals won the title

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ravindra Jadeja | जडेजाने कसोटीत रचला विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला तर जगातील दुसरा खेळाडू

Pravin Darekar | शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘पवारांच्या बोलण्यावर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्व…’

Governor Bhagat Singh Koshyari | राष्ट्रवादीने प्रसिद्ध केले राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे ‘अधोगती पुस्तक’, दिला ‘हा’ शेरा