पुणे : Lions Veterans Cup T-20 Cricket | लायन्स् क्लब पुणे रहाटणी तर्फे आयोजित लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ ‘लायन्स् प्रौढ करंडक’ (४० वर्षावरील गट) टी-२० क्रिकेट स्पर्धेत लवास रॉयल्स् संघाने सलग दुसर्या विजयाची तर, दिक्षित रॉयल्स् संघाने प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून गुणांचे खाते उघडले. (Lions Veterans Cup T-20 Cricket)

मोशी येथील हजारे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स् येथील मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत अमित पार्ले याच्या ९२ धावांच्या स्फोटक खेळीमुळे दिक्षित रॉयल्स् संघाने डिएमटीसी अँड न्युक्लियस इलेव्हनचा १७ धावांनी पराभव करून दोन गुणांची कमाई केली. दिक्षित रॉयल्स् संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १६५ धावांचे आव्हान उभे केले. अमित पार्ले याने ५९ चेंडूमध्ये १४ चौकार आणि एका षटकारासह ९२ धावांची खेळी केली. या धावसंख्येचा पाठलाग करताना डिएमटीसी अँड न्युक्लियस इलेव्हन संघाने १४८ धावांपर्यंत मजल मारली. सुरेश भोसले याने नाबाद ५१ धावांची खेळी करून एकहाती लढा दिला. (Lions Veterans Cup T-20 Cricket)
सिकंदर पाटील याच्या नाबाद ८९ धावांच्या योगदानाच्या जोरावर लवास रॉयल्स् संघाने नवले वॉरीयर्स संघाचा ५ गडी राखून पराभव केला. नवले वॉरीयर्स संघाने अरविंद चौहान (३६ धावा), महेंद्र जगताप (२६ धावा) आणि विजय नवले (२३ धावा) यांच्या कामगिरीच्या जोरावर १५५ धावा धावफलकावर लावल्या. हे आव्हान लवास रॉयल्स् संघाने १९.१ षटकात व ५ गडी गमावून पूर्ण केले. सिकंदर पाटील विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने नाबाद ६० चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह ८९ धावांची खेळी केली. दुसर्या बाजूने त्याला योगेश वाघ (२३ धावा) याचीही साथ मिळाली व संघाने विजय साकार केला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
दिक्षित रॉयल्स्ः २० षटकात ५ गडी बाद १६५ धावा (अमित पार्ले ९२ (५९, १४ चौकार, १ षटकार),
अंजल प्रभू २४, गोरक्ष जाधव १-२५) वि.वि. डिएमटीसी अँड न्युक्लियस इलेव्हनः २० षटकात ६ गडी बाद १४८
धावा (सुरेश भोसले नाबाद ५१ (५३, ३ चौकार), गोरक्ष जाधव २६, पुष्कराज जोशी ३-२५, प्रशांत गेवरी २-२८);
सामनावीरः अमित पार्ले;
नवले वॉरीयर्सः २० षटकात ६ गडी बाद १५५ धावा (अरविंद चौहान ३६, महेंद्र जगताप २६, विजय नवले २३,
विनय निंबाळकर ४-२९) पराभूत वि. लवास रॉयल्स्ः १९.१ षटकात ५ गडी बाद १५९ धावा
(सिकंदर पाटील नाबाद ८९ (६०, ११ चौकार, ३ षटकार), योगेश वाघ २३, मनोहर पाटील २-१८);
सामनावीरः सिकंदर पाटील.
Web Title :- Lions Veterans Cup T-20 Cricket | Second straight win for Lavas Royals; Dixit Royals team opened the points account Lions Veterans Cup T-20 Cricket
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update