शरीरातील गाठीवर घरगुती उपाय ! कोणत्याही भागात येणारी गाठ घालवण्यासाठी 7 आयुर्वेदिक उपचार

पोलीसनामा ऑनलाइन – शरीरात गाठ होणे सामान्य समस्या आहे. यास सामान्य भाषेत चरबीची गाठ किंवा लिपोमासुद्धा म्हणतात. बहुतांश गाठी सूज आणि हानीरहित असतात. मात्र, शरीरात वेदना किंवा सूज आल्यास ही गाठ एखाद्या जखमेमुळे आलेली असू शकते. जर गाठीच्या आजूबाजूची त्वचा लाल आणि गरम असेल तर हा संसर्ग असू शकतो. यासाठी वेळीच डॉक्टरांकडे जा. गाठ चेहरा, मान अथवा गळा, स्तन, पोट-जांघेत, अंडकोष, गुद्दद्वार, हात, मनगट अथवा बोट, खांदा, पाठ, छाती अथवा दंडावर असू शकते. जर एखाद्या भागात गाठ झाली तर काही घरगुती उपाय करू शकता.

गाठीवरील उपाय पुढीलप्रमाणे…

1 लिंबू
लिंबात अँटी इंफ्लेमेटरी गुण असल्याने याच्या मदतीने सूज कमी होते. लिंबू सूज कमी करून चरबीची गाठ दूर करते.

2 सफरचंदाचे व्हिनेगर
सफरचंदाचे व्हिनेगर वापरल्याने शरीर डिटॉक्सीफाय होते. इम्यून सिस्टिम चांगली होते आणि रक्ताभिसरण चांगले होते. यामुळे गाठीपासून आराम मिळतो. मात्र, यावर जास्त संशोधन झालेले नाही.

3 हळद
हळदीत अँटीसेप्टिक, अँटीइंफ्लेमेटरी आणि अँटीमायक्रोबियल गुण असतात. यामुळे सूज कमी होते आणि बॅक्टेरिया दूर करते. यामुळे गाठीपासून सुटका होते.

4 कचनारची ताजी आणि सुकलेली साल
एक ग्लास पाणी आणि एक चमचा गोरखमुंडी (वाटलेली) घेऊन कचनार सोबत वाटून घ्या. कुटलेले कचनार पाण्यात दोन मिनिटे उकळवा. नंतर यामध्ये गोरखमुंडी मिसळा. आता पाणी गाळून घ्या. दिवसातून दोन वेळा हे पाणी प्या. 25 दिवस हा उपाय करा.

5 रुईचे दूध
रुईचे दूध मातीत मिसळा आणि त्याचा लेप गाठीवर लावा. नियमित हा उपाय केल्याने वेदनेसह गाठसुद्धा दूर होण्यास मदत होते.

6 कौंच बी
कौंच बी म्हणजे खाजकुईलीचे बी घासून दोन तीन वेळा लेप केल्याने तसेच गोरखमुण्डीच्या पानांचा आठ-आठ तोळा रस रोज प्यायल्याने गळ्यातील गाठीत आराम मिळतो.

7 पीठ आणि मध
पीठ आणि मध समान मात्रेत मिसळून लेप बनवा आणि तो गाठीवर लावा. 2 ते 3 तास ठेवून नंतर काढून टाका.