Lips कर्करोगाचे लक्षणं असू शकतात कोरडे ओठ; काय आहेत लक्षणे आणि उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेकांना काही प्रमाणात शरीरामध्ये संकट उद्धवल्यास कर्करोगाला (cancer) सामोरे जावे लागते. व्यक्तीच्या शरीरामध्ये काहीं प्रमाणात पेशींची असमान्य वाढ झाल्यास कर्करोगाचा आजार संभवतो. तसेच शरीराच्या अन्य अवयवांप्रमाणेच ओठांवर देखील असामान्य वाढ झाल्यास कर्करोगाचा आजार होऊ शकतो. इतर शरीरातील अवयव सोडून नाजूक अवयवांकडे लोक दुर्लक्षित करतात. यामुळे व्यक्तीच्या सौंदर्यावरही परिणाम होऊन अनेक संकटाला व्याधीला लोकांना मुकावे लागते.

ओठ (lips) कर्करोग सुर्याच्या किरणांमध्ये अधिकाधिक काळ राहिल्यानं उद्भवतो. या शिवाय तंबाखू, गुटखा, असा पदार्थांचे सेवन केल्यास हा आजार होण्यास संभवतो. असे गाजियाबादचे तोंड आरोग्य तज्ञ डॉ. स्मिता यांनी Only my health यांनी माहिती दिलीय. याबाबत लिप कर्करोगाचे उपाय, लक्षणं आणि कारणांबाबत माहिती जाणून घ्या.

कसा ओळखायचा ओठांचा कर्करोग –
> ओठ कोरडे पडणं
> ओठांतून रक्त बाहेर येणं
> दात हलू लागणं
> ओठांमध्ये सूज आणि वेदना
> घसा आणि तोंडाजवळ वेदना जाणवणं
> आवाजात बदल
> खाण्यापिण्यास त्रास उद्भवणं
> ओठांवर लाल अथवा पांढऱ्या रंगाचे डाग
> अन्न गिळायला त्रास होणं.

ओठ कर्करोगाची करणे –
तंबाखू , गुटखा अधिक सेवन केल्यास ओठ कर्करोगाचं कारण ठरू शकतं. याव्यतिरिक्त सुर्याच्या किरणांमध्ये अधिकवेळ बसने, ओरल सेक्स करत असलेल्यांना ओठाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो, धुम्रपान केल्यामुळे लिप्स कॅन्सरला सामोरे जावे लागते. हुक्का पाईप अथवा धुम्रपान केल्यानं या प्रकारच्या आजाराचा धोका वाढू शकतो.

अधिकाधिक धोका कोणाला ?
> महिलांच्या तुलनेत पुरूषांना हा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असतो.
> ४० पेक्षा जास्त वयाच्या अधिक लोकांना लिप कॅन्सर होऊ शकतो.
> दारूचे अधिक सेवन या आजाराचं कारण ठरू शकतं.
> ह्यूमन पेपिलोमा संसर्गाने संक्रमित लोकांना हा आजार उद्भवू शकतो.

निदान काय ?
पहिल्यांदा आपल्या ओठांवरील जखम तपासून लिप कर्करोग स्क्रीनिंग केली जाते. म्हणून डॉक्टर तुम्हाला काही महत्त्वपूर्ण प्रश्न विचारू शकतात. हे जखम किती काळापासून आहे
> कंप्यूटेड स्कॅन केलं जाऊ शकतं.
> MRI म्हणजेच मॅग्नेटिक इमेज रेजोनेंस
> पोसिट्रॉन एमिशन टेस्ट
> चेस्ट एक्स रे
> एंडोस्कोपी

उपचार –
रेडिएशन थेरपी, शस्त्रक्रिया, केमोथेरपी सारख्या तंत्राने केला जातो. या शिवाय कर्करोगाचा अन्यही प्रकारे उपचार केला जातो. उदा. टार्गेटेड थेरेपी, इम्म्यूनोथेरेपी जीन थेरेपी, इनवेस्टिगेटिव ट्रीटमेंट या तंत्रांचा वापर करून कॅन्सरचे योग्य टप्पे ठरवल्यानंतर उपचार केले जातात. तसेच, ओठांची पुनर्रचना केली जाते, जेणेकरून आपले ओठ पूर्वीसारखेच बनतील. ट्यूमर खूप जास्त मोठा असेल तर किमोथेरेपीच्या मदतीनं ट्यूमर छोटा केला जातो.

बचावाचे उपाय काय ?
> तंबाखू आणि गुटख्यापासून लांब राहा
> धुम्रपान करू नका
> फळ आणि भाज्यांचे सर्वाधिक सेवन करा
> नियमित स्वरूपात व्यायाम करा
> निरोगी जीवनशैली ठेवा
> जास्तवेळ उन्हात जाऊ नका
> तोंडाच्या समस्या असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा
> दातांचे नियमित चेकअप करा.
> कॅन्सर झाल्यास डाएट कसं असावं –
> ठराविक वेळेनंतर थोडं थोडं खात राहा
> जास्त मसालेदार, तेलयुक्त पदार्थांचे सेवन करू नका.
> शिळं उघड्यावरचं अन्न खाऊ नका.
> अधिकाधिक पाणी प्या.
> फायबर्सयुक्त आहार घ्या.