Lipstick Effect | लिपस्टिक आणि अंडरवेयरची विक्री सांगते की इकॉनॉमी बिकट अवस्थेत आहे, जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Lipstick Effect | अर्थव्यवस्थेचे (Economy) आरोग्य जाणून घेण्यासाठी अर्थतज्ज्ञ अनेक प्रकारची आकडेवारी आणि ट्रेंडची मदत घेतात. पण, तुम्हाला माहीत आहे का की लिपस्टिक (Lipstick) आणि अंडरवेयर (Underwear) ची विक्रीही अर्थव्यवस्थेची स्थिती सांगते ? हे खरं आहे. याला लिपस्टिक इफेक्ट (Lipstick Effect) म्हणतात.

 

लिपस्टिकचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेत अनेकवेळा दिसून आला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा अर्थव्यवस्थेत मंदी असते किंवा इतर काही दबाव असतो तेव्हा स्त्रिया महागड्या गोष्टींवरील खर्च कमी करतात. परंतु, महिला त्या वस्तुंवर खर्च वाढवतात ज्या बजेटवर नकारात्मक परिणाम न करता त्यांचा मूड चांगला करण्यास मदत करतात. लिपस्टिक ही अशीच एक गोष्ट आहे. या संकल्पनेला लिपस्टिक इफेक्ट म्हणतात. (Lipstick Effect)

 

अमेरिकेत सेन्सस ब्युरोने रिटेल सेल्सचे आकडे जारी केले. त्यानुसार जुलैमध्ये रिटेल सेल स्थिर राहिला आहे. याचा अर्थ महागाईचा परिणाम अमेरिकन जनतेवर होत आहे. जीडीपीमध्ये कंझ्युमर स्पेंडिंगच्या दोन तृतीयांश वाटा आहे.

 

लिपस्टिक इफेक्ट पहिल्यांदा 2001 च्या मंदीच्या काळात चर्चेत आला. तेव्हा असे दिसून आले की अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट असतानाही लिपस्टिकची विक्री वाढली. हे 1929 आणि 1993 च्या महामंदी दरम्यान देखील दिसून आले. त्याला ’लिपस्टिक इंडेक्स’ असे नाव देण्यात आले. या सिद्धांतानुसार, अर्थव्यवस्थेचे आरोग्य आणि सौंदर्यप्रसाधनांची विक्री यांच्यात विपरित संबंध आहे.

आता लिपस्टिकचा प्रभाव दिसत आहे. NPD चे विश्लेषक Natalia Bambiza यांच्या मते, 2022 च्या पहिल्या तिमाहीत लिपस्टिकची विक्री एक वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत 48 टक्क्यांनी वाढली आहे. अमेरिकेसह उच्च महागाईचा परिणाम लोकांच्या बजेटवर होत असल्याचे म्हणणार्‍या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अंडरवेयरच्या विक्रीचा संबंध अर्थव्यवस्थेच्या आरोग्याशी राहीला आहे.

 

अमेरिकेत 2008 मध्ये मंदी आली होती. त्यानंतर यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हचे प्रमुख एलेन ग्रीनस्पॅन यांनी असे म्हटले होते की,
अंडरवेअरच्या विक्रीवरून अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे याचा अंदाज लावता येतो.
ते म्हणाले की मंदीच्या काळात पुरुष नवीन अंडरवेयर खरेदी करणे बंद करतात.
कारण अंडरवेअर दिसत नाही. म्हणूनच लोक अशा कपड्यांवर खर्च करतात जे दिसत नाहीत.

 

जेव्हा अर्थव्यवस्था मंदावते तेव्हा डेटिंग वेबसाइटची कमाई देखील वाढते.
याचे कारण म्हणजे नोकरी गेल्यामुळे लोकांना घरातच राहावे लागते.
अशावेळी ते वेळ घालवण्यासाठी डेटिंग वेबसाइट्सचा वापर करतात.
2009 मधील मार्केटमध्ये आलेल्या घसरणीदरम्यान मॅच डॉट कॉमचा चौथ्या तिमाहीचा नफा मागील सात वर्षातील सर्वाधिक होता.

 

मॉर्गन स्टॅनलेचे विश्लेषक Lauren Schenk म्हणाले की, मंदीच्या काळातही लोकांना प्रेम आणि आपुलकीची गरज असते.
कठीण काळात या गोष्टींची गरज भासते हे तुम्ही समजू शकता.

 

Web Title : –  Lipstick Effect | lipstick and underwear sales reveal the condition of an economy

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा