नागपूरच्या ‘सावजी’मध्ये वाहणार दारुचा पूर ; सरकारकडून दारूची परवानगी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर जिल्ह्यातील खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य ठेवा समजल्या जाणाऱ्या सावजी हॉटेल्स, रेस्टारंट आणि ढाब्यामध्ये दारूची परवानगी देण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरु केले आहे. मात्र, सावजीमध्ये जेवणाऱ्या खवय्यांनी याला विरोध केला आहे. तर सावजी ब्रॅण्डला धक्का पोहचणार नाही असे अनेकांचे म्हणणे आहे. उत्पानद शुल्क विभागाच्या या निर्णयानंतर एकट्या नागपूरमधून परमिट रुमसाठी १५० अर्ज आले आहेत.

नागपूरमध्ये गेलेला प्रत्येकजण सावजीमध्ये जाऊन मनसोक्त व्हेज-नॉनव्हेजवर ताव मारतोच. झणझणीत जेवण हे सावजीचे खास वेगळेपण आहे. मात्र, याच सावजीमध्ये आता दारुचा महापूर वाहण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सावजीमध्ये परमिट रुमचा परवाना देण्यास सुरुवात केली आहे. मात्र हे परवाने देण्यामध्ये विभागाने वेगळाच तर्क लावला आहे. सावजीमध्ये जेवण करणारे बहुतांश लोक मद्यपान करतात. या ठिकाणी जेवण करण्यासाठी आलेल्या लोकांना सावजीमध्ये चोरून मद्यपुरवठा करतात. त्यामुळे शासनाचा कोट्यावधीर रुपयांचा महसूल बुडतो. त्यामुळे सावजी रेस्टॉरंट, ढाब्यांना परमिट रुमची परवानगी देण्यात येत आहे.

दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सावजीमध्ये मद्य विक्री करण्याचे परवाने देण्याचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त करून विरोध केला आहे. विभागाच्या या निर्णयाला काही सावजी रेस्टॉरंट मालकांनीच विरोध केला आहे. सावजीचे जेवण आणि दारूची सरमिसळ केल्याने सावजी ब्रॅण्डला धक्का बसले असे रेस्टॉरंट मालकांना वाटत आहे. त्यामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही