दारू विक्रीस परवानगी द्या, अवैध व्यापारामुळं सरकारच्या तिजोरीचं मोठं नुकसान : CIABC

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहॉलिक बेवरेजेज कंपनी (CIABC) ने 10 राज्य सरकारांना दारु विक्रीसाठी परवानगी देण्याचा आग्रह केला आहे. संघटनेने सांगितले की लॉकडाऊन दरम्यान दारुच्या विक्रीवर पूर्णपणे प्रतिबंधामुळे अवैध आणि बनावट दारुची विक्री वाढत आहे.

CIABC च्या मते, यामुळे सरकारी तिजोरीचे नुकसान होत आहे. संघटनेचे म्हणले आहे की देशभरातील लॉकडाऊनमुळे दारुची सर्व होलसेल आणि रिटेल दुकानं बंद आहेत. CIABC ने सांगितले की, दिल्ली, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगाणा, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांना या संबंधित पत्र लिहिले आहे.

CIABC चे महानिदेशक विनोद गिरी यांनी आपल्या पत्रात लिहिले की राज्यात अवैध आणि बनावट दारुच्या विक्री संबंधित रिपोर्टमध्ये वाढ होत आहे. पत्रात लिहिले आहे की यामुळे लोकांना आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर याचा परिणाम होऊ शकतो.
संघटनेने सर्व राज्य सरकारांना दारु संबंधित परवाने आणि मंजुरी देण्यासाठी आग्रह केला आहे.

गिरी म्हणाले की दारु राज्य सरकारसाठी उत्पन्नाचा मोठा स्त्रोत आहे आणि दारुची रिटेल दुकान बंद असल्याने राज्य सरकारला कराच्या रुपात महसूल मिळत नाही. जो कोरोनासारख्या महामारीशी लढण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. ते म्हणाले की काही लोकांना आरोग्याच्या कारणांसाठी दारुची आवश्यकता असते आणि ही बाब देखील लक्षात घेतली पाहिजे.