Lockdown 3.0 : काय सांगता ! होय, पहिल्याच दिवशी ‘या’ राज्यात 45 कोटींच्या मद्याची विक्री

पोलिसनामा ऑनलाईन टीम – केंद्र सरकारने लॉकडाउनचे अनेक निर्बंध सशर्त शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. रेड, ग्रीन आणि ऑरेंज या तिन्ही झोनमध्ये मद्यविक्रीला परवानगीही दिली आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी देशभरात मद्यविक्रीच्या दुकानाबाहेर मद्यप्रेमींच्या भल्यामोठ्या रांगा लावल्याचे दिसून आले. पहिल्याच दिवशी कर्नाटकात तब्बल 45 कोटी रूपयांची मद्यविक्री झाली आहे.

कर्नाटक उत्पादन शुल्क विभागाकडून पहिल्याच दिवशी तब्बल 45 कोटी रूपयांची मद्यविक्री झाली असल्याची माहिती दिली आहे. लॉकडाउनच्या तिसर्‍या टप्प्यात कॅन्टोनमेंट झोन सोडून रेड, ग्रीन आणि ऑरेंज या तिन्ही झोनमध्ये सशर्त सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. तिन्ही झोनमध्ये मद्यविक्रीला परवानगीही देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

दीड महिने मद्यापासून वंचित असलेल्या मद्यप्रेमींनी सकाळपासूनच मद्यविक्रीच्या दुकानांसमोर गर्दी केली होती. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी दुकानदारांनी ठराविक अंतरावर गोल रिंगण करण्यात आले होते. वाढती गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्यामुळे पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. कर्नाटकात, महाराष्ट्रात, दिल्लीत आणि अन्य ठिकाणीही सकाळपासूनच मद्यप्रेमींनी रांगा लावल्या होत्या. काही ठिकाणी मद्यविक्री सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने अनेक मद्यप्रेमींना माघारी फिरावे लागले होते.