परराज्यातून आणलेली दारू जप्त

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गस्तीवर असताना वाहनांची तपासणी करत परराज्यातून आणण्यात आलेली दारू जप्त केली. पथकाने वाहनासह ५ लाख ८० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी रात्री शिरपूर तालुक्यातील आंबा शिवारात करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक शिरपूर तालुक्यातील आंबा ते वरला रस्ता या दरम्यान गस्त घालत होते. यावेळी पथकाने काही वाहनांची तपासणी केली. रात्री साडे दहाच्या सुमारास बोलेरो (एमपी ०४ जीए २८७६) गाडीचा संशय आल्याने पथाने गाडी थांबवून चौकशी केली. चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी गाडीत मध्यप्रदेश निर्मित व विक्री करता असलेले बीअरचे ८८ बॉक्स आढळून आले. यामध्ये १ हजार ५६ बाटल्या होत्या. त्याची किंमत १ लाख ५ हजार ६०० रुपये आहे. पथकाने बिअरच्या बॉक्ससह बोलेरो गाडी जप्त केली. या कारवाईत ५ लाख ८० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पथकाने याप्रकरणी संतोष सायदास राठोड (वय -२८, रा़ दुगाणी ता़ वरला जि़ बडवानी, मध्यप्रदेश) आणि संजय शांतीलाल जमरे (वय -२५, अस्फताल फलीया, ग्राम सावरीया, ता़ पाटी, जि़ बडवानी, मध्यप्रदेश) या दोघा अटक केली आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संचालक सुनील चव्हाण, नाशिक विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.