अभिनेत्री लिसा हेडननं शेअर केला ‘बेबी बंप विथ बिकीनी’ फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस लिसा हडेन प्रेग्नंट आहे. सोशलवर प्रेग्नंसीचे अनेक फोटो लिजाने शेअर केले आहेत. यात तिच्या बेबी बंपमधील बिकीनीचा फोटोही आहे. यात ती समुद्रकिनाऱ्यावर दिसत आहे. लिजाच्या शेवटच्या महिन्यातील शेवटच्या काही दिवसांमधला हा फोटो आहे. आपला बेबी बंप विथ बिकीनी फोटो शेअर करत लिसाने खास कॅप्शनही दिलं आहे.

आपल्या कॅप्शनमध्ये लिसा म्हणते, ““Munching my way through this last trimester. #alwaysfirsttothetable p.s last bump photo I promise… have to fly home now and find some clothes that actually fit (sic).”

लिसा सिनेमांपासून दूर असली तरी हिंदी आणि इंग्रजी वेब सीरीजमध्ये ती मोठ्या प्रमाणात दिसते. प्रेग्नंट असूनही लिजाची फिगर अनेक सिंगल आणि न्यूकमरच्या फिगरला टक्कर देत आहे.

लिसाचं ओरिजिनल नाव एलिझाबेश मेरी हेडन आहे. 17 मे 2017 रोजी लिसाने इंस्टाग्रामवर आपला मुलगा जॅक लालवानीच्या जन्माची घोषणा केली होती. लिसाची आई ऑस्ट्रेलियन नागरिक आहे. तिचे वडिल तमिळ आहेत.

लिसाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर सध्या ती इंडियाज टॉप मॉडेल शो साठी जजिंग करत आहे. लिसाने आयशा, क्विन, हाऊसफुल 3 अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. भारतात मॉडेलिंग करण्याआधी लिसा ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत रहात होती.

https://www.instagram.com/p/BydJ_yhFuTU/

Visit : Policenama.com