राम मंदिर ट्रस्टच्या 15 सदस्यांची यादी जाहीर, ‘या’ पंधरा जणांवर असणार मंदिराच्या निर्माणाची जबाबदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राम मंदिर ट्रस्टची घोषणा केली. यानंतर चार तासांनी ट्रस्ट संबंधीत 15 सदस्यांची माहिती समोर आली आहे. अयोध्या वादामध्ये हिंदू पक्षाचे प्रमुख वकील असलेले 92 वर्षीय के. पराशरण यांना ट्रस्टी बनवण्यात आले आहे. तसेच एक शंकराचार्य आणि 5 धर्मगुरु ट्रस्टमध्ये असणार आहेत. अयोध्याचे माजी शाही घराण्यातील राजा विमलेंद्र प्रतपा मिश्रा, अयोध्यातील होमीओपॅथी डॉक्टर अनिल मिश्रा आणि जिल्हाधिकारी यांना या ट्रस्टचे सदस्य बनवण्यात आले आहे.

यापूर्वी बनवण्यात येणाऱ्या ट्रस्टमध्ये चार शंकराचार्याचा समावेश केला जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र, सरकारने प्रयागराज येथील ज्योतिषपीठाधीश्वर स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांचाच समावेश ट्रस्टमध्ये केला आहे. तसेच निर्मोही आखाड्याचा देखील ट्रस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. आखाड्याचे महंत दिनेंद्र दास यांना ट्रस्टी बनवण्यात आले आहे. परंतु त्यांना मतदानाचा अधिकार नसणार आहे.

हे आहेत 15 ट्रस्टी
1. के. पाराशरण – के पराशरण हे सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील आहेत. त्यांनी अयोध्या प्रकरणात 9 वर्षे हिंदू पक्षाची बाजू मांडली आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये ते अटॉर्नी जनरल राहिले आहेत. त्यांना पद्म भूषण आणि पद्म विभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
2. जगतगुरू शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वतीजी महाराज (प्रयागराज): बद्रीनाथ येथील ज्योतिष पीठाचे शंकराचार्य आहेत. शंकराचार्य म्हणून त्यांची नियुक्ती केल्यावरून वाद झाला होता. द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी ज्योतिष मठाच्या शंकराचार्य पदवीसंर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
3. जगतगुरु माधवाचार्य स्वामी विश्व प्रसन्नतिर्थी महाराज : कर्नाटकच्या उडुपी स्थित पेजावर मठाचे 33 वे पीठाधीश्वर आहेत. पजावर मठातील पीठाधीश्वर स्वामी विश्वेशतीर्थ यांच्या निधनानंतर डिसेंबर 2019 मध्ये त्यांनी हे पद स्वीकारले.
4. युगपुरुष परमानंद महाराज : अखंड आश्रम हरिद्वारचे प्रमुख. वेदांतवर दीडशेहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सन 2000 मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आध्यात्मिक नेत्यांच्या समिटला संबोधित केले.
5. स्वामी गोविंद देव गिरी जी महाराज : यांचा जन्म महाराष्ट्रातील अहमनदनगरमध्ये 1950 मध्ये झाला. रामायण, श्रीमद्भगवद्गीता, महाभारत आणि इतर पौराणिक ग्रंथांचे देश-विदेशात प्रवचने करतात. स्वामी गोविंद देव हे महाराष्ट्राचे प्रख्यात आध्यात्मिक गुरु पांडुरंग शास्त्री आठवले यांचे शिष्य आहेत.
6. विमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा : अयोध्या राजघराण्याचे वंशज. रामायण संरक्षण समितीचे सदस्य व समाजसेवक आहेत.2009 मध्ये बसपच्या तिकिटावर लोकसभा निवडणुक लढवली, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर त्यांनी कधीही राजकारणात प्रवेश केला नाही.
7. डॉ. अनिल मिश्रा, होमिओपॅथी डॉक्टर : मूळचे आंबेडकरनगर येथील रहिवासी असलेले अनिल मिश्रा अयोध्यामधील प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर आहेत. ते होमिओपॅथी मेडिसिन मंडळाचे कुलसचिव आहेत. माजी खासदार विनय कटियार यांच्यासमवेत 1992 मध्ये राम मंदिर चळवळीत मिश्रा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
8. श्री कामेश्वर चौपाल, पटना (एससी सदस्य) : संघाने कामेश्वरला प्रथम कारसेवक दर्जा दिला आहे. त्यांनी 1989 मध्ये राम मंदिरात पायाभरणीची पहिली वीट ठेवली. राम मंदिर चळवळीत सक्रिय भूमिका व दलित असल्याने त्यांना ही संधी देण्यात आली. 1991मध्ये रामविलास पासवान यांच्या विरुद्ध लोकसभा निवडणूक लढवली.
9. विश्वस्त मंडळाने नियुक्त केलेला विश्वस्त, जो हिंदू धर्माचा आहे.
10. विश्वस्त मंडळाने नियुक्त केलेला विश्वस्त, जो हिंदू धर्माचा आहे.
11. महंत दिनेंद्र दास : अयोध्याच्या निर्मोही आखाडयाच्या अयोध्या बैठकीचे प्रमुख. त्यांना ट्रस्टच्या बैठकीतमध्ये मतदान करण्याचा अधिकार नसणार आहे.
12. केंद्र सरकारचा प्रतिनिधी, जो हिंदू धर्माचा असेल आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत भारतीय प्रशासकीय सेवेचा (आयएएस) अधिकारी असेल. ही व्यक्ती भारत सरकारच्या सहसचिव पदाच्या खालचा नसेल. ते माजी सदस्य असतील.
13. राज्य शासनाचा एक प्रतिनिधी, जो हिंदू धर्माचा असेल आणि उत्तर प्रदेश सरकार अंतर्गत भारतीय प्रशासकीय सेवेचा (आयएएस) अधिकारी असेल. ही व्यक्ती राज्य सरकारच्या सेक्रेटरी पदाच्या खालीची नसेल. ते माजी सदस्य असतील.
14. अयोध्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे ट्रस्टीचे पदाधिकारी असतील. ते हिंदू धर्माचे अनुयायी असतील. काही कारणास्तव सध्याचा जिल्हाधिकारी हिंदू धर्माचा नसल्यास अयोध्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी (हिंदू धर्म) हे सदस्य असतील.
15. राम मंदिर विकास आणि प्रशासनाशी संबंधित बाबींचा अध्यक्ष ट्रस्टी नेमतील. ते हिंदू असलेच पाहिजे.