अरे बापरे ! ऑगस्ट महिन्यात तब्बल ‘इतके’ दिवस असणार बँका बंद, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सध्या जुलै महिना संपला असून ऑगस्ट महिना सुरु होतोय. तरीही, राज्यात लॉकडाऊन सुरुच आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे. यातच आता ऑगस्ट महिन्यात आता 17 दिवसही बँका बंद राहणार आहेत. कारण, बँकांना त्याप्रमाणे सुट्ट्या असणार आहेत. बँकांच्या सुट्ट्यांबाबतची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.

ऑगस्ट महिन्यात जर तुमचे कोणते काम असेल तर, त्यांच्याकरीता बँकेत जाण्याची आवश्यकता भासणार असेल, तर त्यांच्यासाठी ही महत्वााची वृत्त आहे. कारण, लॉकडाऊनमध्ये बँकेच्या उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळेत बदल झाला होता. तरीही लॉकडाऊनमध्ये बँक कर्मचारी काम करत होते.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात बँकांना 17 दिवस सुट्टी असणार आहे. यात रविवार तसेच दुसरा-चौथा शनिवार पकडून असे 17 सुट्ट्यांचे होत आहेत.

अशा आहेत बँकांना सुट्ट्या

बकरी ईदच्या सुट्टीपासून 31 ऑगस्ट रोजी असणार्‍या ओणमपर्यंत बँकाना सुट्ट्या असणार आहेत. 1 ऑगस्ट रोजी बकरी ईदमुळे तर, दुसर्‍याच दिवशी रविवार असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत. तसेच 3 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर 8 ऑगस्ट रोजी दुसरा शनिवार आणि 9 ऑगस्ट रोजी रविवार असल्यामुळे पुन्हा बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी श्री कृष्ण जयंती, तर त्यानंतर दुसर्‍या दिवशी गोपाळकाला असल्यानेही या दिवशी बँका बंद असणार आहेत.

त्यानंतर 13 ऑगस्टला ‘पॅट्रिओटिक डे’च्या निमित्ताने इम्फाळ झोनमध्ये बँका बंद असणार आहेत. तर 15 ऑगस्ट दिवशी स्वातंत्र्य दिन असल्याने बँकेला सुट्टी आहे. तर 20 ऑगस्ट रोजी श्रीमंत संकरादेव यांच्या तिथीनिमित्त काही झोनमध्ये बँकांना सुट्टी असते. 21 ऑगस्ट रोजी हरितालिका आणि 22 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीनिमित्त बँका बंद असणार आहेत. याशिवाय 29 ऑगस्टला कर्मा पूजेनिमित्त काही झोनमध्ये तर, 31 ऑगस्ट रोजी तिरुओणम निमित्ताने बँका बंद असणार आहेत.

या सुट्ट्यांच्या दिवशी एटीएम आणि मोबाइल व्हॅन संबंधित कामे करू शकतात. त्याचप्रमाणे ज्या बँकांमध्ये ऑनलाइन व्यवहार शक्य आहे, ते व्यवहार देखील चालू राहणार आहेत.

टीप –  ऑगस्ट महिन्यात देशातील वेगवेगळया राज्यातील बँका एकूण 17 दिवस बंद असणार आहेत. आरबीआयच्या वेबसाईटनुसार एकूण 17 दिवस बँका बंद राहतील पण त्या वेगवेगळया झोनमधील असतील.