‘हे’ असणार आहेत महाराष्ट्रातील भाजपचे स्टार प्रचारक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी आपल्या पक्षातील ४१ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. २४ तारखेला कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात नारळ फोडून भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह ४० नेत्यांची फौज महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला उतरणार आहे.

महाराष्ट्रातील स्टार प्रचारक म्हणून लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, एकनाथ खडसेंसारख्या अंधारात गेलेल्या नेत्यांना उजेडात आणण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. त्यांच प्रमाणे मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी बोलावण्यात येणार आहे.

नरेंद्र मोदी, अमित शहा, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंग, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, योगी आदित्यनाथ, शहानवाज हुसेन, पियुष गोयल, शिवराज सिंग चौहान, मुक्तार अब्बास नक्वी, मुरली मनोहर जोशी या राष्ट्रीय राजकारणातील नेत्यांचा समावेश महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांच्या यादीत करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विनोद तावडे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, राम शिंदे, संभाजी पाटील निलंगेकर या राज्यातील नेत्यांचा देखील स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.