Jio : इथं पहा कंपनीच्या सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅनची लिस्ट, सुरूवातीची किंमत 129 रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जिओ भारतात आपल्या प्रीपेड यूजर्सला काही खुप स्वस्त प्लॅन उपलब्ध करून देते. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, हाय स्पीड डेटा आणि इतर फायदे दिले जातात. याच स्वस्त प्लॅनमुळे टेलीकॉम मार्केटच्या इतर कंपन्याना स्वस्त प्लॅन्स बाजारात आणावे लागतात. सध्या आपण जिओच्या स्वस्त प्लॅनची माहिती जाणून घेवूयात, ज्यांची किंमत 250 रुपयांपेक्षा कमी आहे.

129 रुपयांचा प्लॅन
हा कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. यामध्ये ऑन-नेट फ्री कॉलिंग, ऑफ-नेट कॉलिंगसाठी 1,000 मिनिटे, 300 एसएमएस आणि 2 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. तसेच जिओ सिनेमा आणि जिओ टीव्हीसारख्या अ‍ॅप्सचा फ्री अ‍ॅक्सेस मिळतो. याची 28 दिवसांची वैधता आहे.

149 रुपयांचा प्लॅन
हा प्लॅन 24 दिवसांच्या वैधतेसोबत येतो आणि यामध्ये रोज 1 जीबी डेटा ग्राहकांना दिला जातो. सोबतच ऑन-नेट फ्री कॉलिंग, रोज 100 एसएमएस आणि ऑफ-नेट कॉलिंगसाठी 300 मिनिटे मिळतात. सोबतच जिओ अ‍ॅप्स फ्री अ‍ॅक्सेस मिळतो.

199 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते. रोज 1.5जीबी डेटा, रोज 100 एसएमएस, फ्री ऑन-नेट कॉलिंग, ऑफ-नेट कॉलिंगसाठी 1,000 मिनिटे आणि जिओ अ‍ॅप्सचा फ्री अ‍ॅक्सेस दिला जातो.

249 रुपयांचा प्लॅन
हा 2 जीबी डेली डेटाचा प्लॅन आहे. याची वैधता 28 दिवसाची आहे. सोबतच ऑन-नेट फ्री कॉलिंग, ऑफ-नेट कॉलिंगसाठी 1,000 मिनिटे, रोज 100 एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्स फ्री अ‍ॅक्सेस आहे.

You might also like