काय सांगता ! होय, भारतातील ‘या’ राज्यात एक-दोन नव्हे तर 5 – 5 ‘उपमुख्यमंत्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसताना राज्यपालांनी अखेर राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे. त्यामुळे राज्यात आता कोणाचीही सत्ता नाही आणि राष्ट्रपती राजवट लागणार हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नाचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

अशात शिवसेनेसोबत जाताना राष्ट्रवादी आणि काँग्रेस अनेक पदांच्या फॉर्म्युल्याबाबत विचार करत आहे. जाणून घेऊयात कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये उप मुख्यमंत्री पदासोबत अनेक पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलेले आहे.

आंध्र प्रदेशात आहेत पाच उप-मुख्यमंत्री –
आंध्र प्रदेशात वायएसआरचे जगन मोहन रेड्डी यांचे सरकार आहे. या सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्री कार्यरत आहेत. यामध्ये पिल्ली सुभाष चंद्र बोस, अल्ला नानी, के नारायण स्वामी, पमुला पुष्पा श्रीवानी आणि अमजद बाशा शेख बेपारी असे तब्बल पाच उपमुख्यमंत्री आहेत.

कर्नाटकात तीन उपमुख्यमंत्री –
कर्नाटकातील मोठ्या राजकीयनाट्यानंतर भाजपच्या येडीयुरप्पा सरकारमध्ये सुद्धा तीन उप मुख्यमंत्री आहेत. सी.एन. अश्वस्थ नारायण, गोविंद एम. करजोल आणि लक्ष्मण सादवी असे तीन उप मुख्यमंत्री आहेत.

उत्तर प्रदेशात आहेत दोन उपमुख्यमंत्री –
उत्तर प्रदेशामध्ये पूर्ण बहुमत असूनदेखील भाजप सरकारने राज्यात दोन उपमुख्यमंत्रीपदे ठेवलेली आहेत. दिनेश शर्मा आणि केशव प्रसाद मौर्य असे दोन उपमुख्यमंत्री सध्या उत्तर प्रदेशमध्ये विराजमान आहेत.

गोव्यात दोन उपमुख्यमंत्री –
गोव्यात देखील भाजप सरकारने सरकार चालवण्यासाठी दोन उप मुख्यमंत्री नेमलेले आहेत. मनोहर अजगांवकर आणि चंद्रकांत कवलेकर असे दोन उपमुख्यमंत्री सध्या गोव्यात कार्यरत आहेत.

देशातील बाकी बारा राज्यांमध्ये एक एक मुख्यमंत्री अस्तित्वात आहे ज्यामध्ये राजस्थान, हरियाणा, गुजरात, दिल्ली, बिहार आणि तमिळनाडु या राज्यांचा समावेश आहे.

Visit : Policenama.com